माणसातला देव पाहायचा असेल तर तो म्हणजे संजय कोठारी – मुख्यकार्यकारी अधिकारी आनंद भंडारी

जामखेड प्रतिनिधी

जामखेड येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी उल्लेखनीय उद्गार काढले “आपण देव अद्याप पाहिलेला नाही, पण माणसातला देव पाहायचा असेल तर तो म्हणजे संजय कोठारी.”

जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि कोठारी प्रतिष्ठान, समर्थ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात जामखेड परिसरातील ३५० विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन क्वायर बुक देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी होते.

आपल्या मनोगतात बोलताना भंडारी म्हणाले, “मी गेल्या पाच महिन्यांपासून अहमदनगर जिल्ह्यात कार्यरत आहे आणि प्रत्येक पंधरा दिवसांनी संजय कोठारी यांच्या कार्याच्या बातम्या वर्तमानपत्रात वाचतो. एवढ्या तरुण वयात इतकी समाजसेवा करणे ही मोठी गोष्ट आहे. आतापर्यंत त्यांनी ६५०० लोकांचे प्राण वाचवले आहेत. कोरोना काळातही त्यांनी आपले कार्य थांबवले नाही. एवढंच नव्हे तर देहदान या महत्त्वाच्या कार्यात त्यांनी पुढाकार घेत ४९९ जणांचे फॉर्म भरून घेतले असून २४ जणांचे देहदान यशस्वीरित्या पार पाडले आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींना वाचवून रुग्णालयात नेऊन जीवदान देणारे संजय कोठारी हे खरोखर माणसातले देव आहेत.” त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, “अशा व्यक्तींकडून प्रेरणा घ्या, मन लावून शिका आणि समाजसेवेची भावना जपा.”

या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोनचे प्रांतीय अध्यक्ष मोहनलाल लोढा, राष्ट्रीय मंत्री वसंत लोढा, विहार धाम योजनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलाल चोपडा, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य नंदकुमार भटेवरा, राजेंद्र बलदोटा, हेमराज खाबिया, तसेच दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव बापू देशमुख, सचिव अरुणसेठ चिंतामणी, प्राचार्य बाळासाहेब पारखे, राजेश मोरे, उद्योजक कांतीलाल कोठारी, बी.डी.ओ. शुभम जाधव, सीए दिनेश राका, बाळासाहेब संचेती,भारतीय जैन संघटना जिल्हाध्यक्ष अमोल तातेड, समर्थ हॉस्पिटलचे संचालक डॉ. भरत दारकुंडे, मॅथ्सवर्ल्ड क्लासेसचे प्रा. धनंजय भोसले, युवा उद्योजक मनोज दुगड, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष युवराज ढेरे, तालुका शिक्षणाधिकारी प्रदीप चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी खताळ साहेब, उपमुख्याध्यापक राजमाने सर, पोते सर, लहाने सर, जगदाळे सर, घोडेश्वर सर आणि सर्व अध्यापक बंधू-भगिनी, एनसीसी ग्रुप, डहाळे सर, मिठूलाल नवलाखा, बाळासाहेब संचेती, सचिन गाडे, दीपक भोरे, डॉ. सुनील बोराडे, देडे सर, साई भोसले सर उपस्थित होते.

या कार्यक्रमात कोठारी प्रतिष्ठानतर्फे उत्कृष्ट रांगोळी काढणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच एनसीसी विद्यार्थ्यांचा, शिक्षक अनिल देडे यांचा आणि उत्कृष्ट नियोजन व सहकार्याबद्दल साई भोसले यांचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आणि संजय कोठारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बाळासाहेब पारखे यांनी केले, तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन निलेश दिवटे यांनी केले. हा कार्यक्रम फक्त वह्यांचे वाटप नव्हे तर समाजसेवा, शिक्षण आणि मानवीतेचा सुंदर संगम ठरला. संजय कोठारी यांच्या कार्याने जामखेड आणि अहमदनगर जिल्ह्याला अभिमान वाटावा असे उदाहरण घालून दिले आहे. “शिक्षण, सेवा आणि मानवता — या तीन गोष्टींवर समाज उभा राहतो, आणि संजय कोठारी या तीनही गोष्टींचे प्रतीक आहेत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here