

दोन्ही आमदार आसुनही जामखेड शहराचा विकास खुंटला- ॲड डॉ. अरुण जाधव
जामखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी तिसरी आघाडी जाहीर- राहुल उगले
जामखेड प्रतिनिधी
जामखेडची बाजारपेठ राज्यात प्रसिद्ध आहे. पण जामखेड करांना सध्या अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. आठ वर्षे नगरपरिषद बाजाराचा ठेका नाही, कचरा ठेका निघत नाही, पाणीपुरवठा मंजूर असूनही योजना वेळेत पूर्ण होत नाही. त्यामुळे जामखेड करांना पाणी मिळत नाही. शहरातील रस्ता पुर्ण होत नाही नागरिकांना धुळीचा खड्डयांचा सामना करावा लागत आहे. गटारांची सुविधा नाही याला सर्वाना जबाबदार सभापती व विद्यमान आमदार यांच्यातील भांडण जबाबदार आहे. यामुळे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत अशी टिका अँड डॉ. अरूण जाधव यांनी केली.

जामखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विरोधात समविचारी पक्षांना एकत्र घेऊन वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, राष्ट्रीय समपक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांना एकत्र येऊन तिसरी आघाडी करण्यात आली आहे. तिसऱ्या आघाडीची आज पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी ते बोलत होते.
यावेळी ॲड.डॉ.अरुण जाधव – वंचित बहुजन आघाडी, राहुल उगले – काँग्रेस, विकास मासाळ राष्ट्रीय समपक्ष, व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी आज पत्रकार परिषदेत घेत दोन बलाढ्य शक्तीच्या विरोधात आम्ही सामान्य जामखेड विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविणार आहोत. आणि नक्कीच यश मिळेल असे जाधव यांनी सांगितले.

यावेळी बोलताना काँग्रेस सरचिटणीस राहुल उगले म्हणाले की, दोन्ही नेत्यांच्या हुकूमशाहीला जामखेड कर वैतागलेले आहेत. यामुळे तिसरी आघाडी निर्णायक ठरणार आहे. काँग्रेस ची वोट बँक आहेच. तसेच आम्ही तिसऱ्या आघाडीचा जनतेच्या मनातील नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देणार आहोत.
आजच्या मुस्लिम समाजाच्या स्वतंत्र उमेदवार देण्याच्या निर्णयावर उगले म्हणाले की, मुस्लिम समाजाच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार देणार याविषयी म्हणाले की, आमच्या कडे नगराध्यक्ष पदासाठी चार उमेदवार आहेत तरीही जर तो सर्वसमावेशक चेहरा असेल तर आम्ही तिसरी आघाडी त्यांना पाठिंबा देऊ असेही सांगितले.

सभापती प्रा राम शिंदे यांनी दोन दिवस जामखेड मध्ये थांबून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या, राष्ट्रवादी काँग्रेस ही मुलाखती घेत आहे. समविचारी पक्षां बरोबर बोलणी सुरू आहे. लवकरच ठरेल की काय होत आहे. आता या दोघांविरोधात तिसरी आघाडी मैदानात उतरली आहे. आणि वेगळाच निकाल लागेल व तिसरी आघाडी नगरपरिषदेत असेल असे जाधव व उगले यांनी सांगितले.
स्वच्छ सुंदर जामखेड साठी शहराच्या विकासासाठी दोन महाशक्ती विरोधात तिसरी आघाडी मैदानात उतरली आहे. तिसरी आघाडी ही सामान्य नागरिकांची आहे. ज्या समाजाला प्रतिनिधित्व मिळाले नाही त्यांना प्रतिनिधित्व देऊ असेही सांगितले.





