

कोणत्याही पक्षाने नगराध्यक्षा पदाची उमेदवारी द्यावी, अन्यथा मुस्लिम समाज नगराध्यक्षा पदासाठी अपक्ष उमेदवार उभा करणार
मुस्लिम समाज्याने घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली घोषणा
जामखेड प्रतिनिधी
प्रत्येक निवडणुकीत सर्वच पक्षांनी मुस्लिम समाज्याचा मता पुरता वापर केला. निवडणूका आल्या की फक्त गोड बोलुन काम करुन घेतात मात्र आता येणाऱ्या नगरपरिषद निवडणूकीत कोणत्याही पक्षाने मुस्लिम समाज्याला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी द्यावी, अन्यथा मुस्लिम समाज्याच्या वतीने नगराध्यक्षा पदासाठी अपक्ष उमेदवार देणार असल्याची माहिती घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अझरभाई काझी यांनी व्यक्त केले.

जामखेड शहरात नगरपरिषद निवडणुकीच्या आनुशंगाने जामखेड येथील मुस्लिम समाज्याच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी पुढे बोलताना अझरभाई काझी म्हणाले की आजपर्यंत सर्वांनीच आपल्या पध्दतीने सर्वच पक्षाला मदत केली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुक असो विधानसभा निवडणुक असो आपल्या पद्धतीने मुस्लिम समाज सर्वच पक्षासोबत इमारदारीने राहीला आहे. जामखेड मध्ये देखील मुस्लिम समाजाला कोणी जवळ करत नाही. आम्हाला दोन लोकप्रतिनिधी आसुन देखील ते विचारत घेत नाहीत. आमच्या मुस्लिम समाज्यातील व्यक्तीला तिकीट देण्यात यावे नेहमीच सर्वच पक्ष मुस्लिम समाज्याला वेगळे ठरवत आहेत. आम्ही आमच्या समाज्याचा उमेदवार उभा करणार आसुन त्याचे परीणाम आमची दखन न घेतल्यास सर्वच पक्षांना भोगावे लागतील.

सभापती प्रा. राम शिंदे, आमदार रोहित पवार, प्रा. मधुकर राळेभात म्हणजे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या सर्व पक्षांना आजपर्यंत मदत केली आहे. भाजप मधील अनेक उमेदवारांना निवडणूक आणले आहे. तरीही मुस्लिम समाज भाजपाला मतदान करत नाही असे भासवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही विघ्न संतोषी करतात.
भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाने आमच्या समाजातील कोणत्याही उमेदवारास नगराध्यक्ष पदाची उमेदवारी द्यावी आम्ही त्यास निवडून आणू शेजारी आष्टी, पाटोदा तालुक्यात उमेदवारी मिळते मग जामखेड मध्ये का नाही असा प्रश्न विचारला. आता आम्ही कोणाच्याही मागे राहणार नाहीत. आमचा स्वतंत्र उमेदवार उभा करू असे सांगितले. मुस्लिम समाजातील उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी कोणत्याही पक्षाची उमेदवारी घ्यावी आमची काहीही हरकत नाही. फक्त नगराध्यक्ष पदासाठी आमचा स्वतंत्र उमेदवार राहिल आमच्या समाजाचे साडेसात हजार मते आहेत. आणि इतर अल्पसंख्याक समाज आमच्या बरोबर आहे. त्यामुळे आम्ही निवडून येणार आहोत. पत्रकार परिषदे दरम्यान शहरातील शेकडोंच्या संख्येने मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.








