
सभापती महोदयांनी आपल्या शिलेदराचा केक कापुन वाढदिवसा केला साजरा..
पाठीवर हाथ ठेवुन सदैव जनसेवेसाठी लढं! दिला कानमंत्र
जामखेड प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन घुमरे यांचा आज वाढदिवस होता आणि इकडं जामखेड नगरपरिषद निवडणूकीची रणधुमाळी सुरू इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज दिवसभर स्वतः सभापती महोदयांनी या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. आणि नंतर आज आपल्या कार्याकर्ताचा वाढदिवस आहे आणि त्याला शुभेच्छा देणे हा तर साहेबांचा स्वभाव आहे त्यामुळे तर त्यांना “आपला तो आपला” असे संबोधले जाते.

त्याला कारणही तसेच आहे सचिन(नाना) घुमरे यांनी आपला वाढदिवस हा कोणताही डामडौल न करता त्यांनी सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करावयाचा संकल्प केला आणि दिघोळ गणातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप केले सभापती प्रा.राम शिंदे यांच्या वाढदिवसा निमीत्तानेही त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. याच बरोबर बाजार समितीत शेतकरी बांधवांना सर्व सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत आणी बळीराजा सुखी झाला पाहिजे यासाठी संचालक सचिन घुमरे नेहमी आग्रही भूमिकेत आसतात.








