

जनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या मोफत ई- केवायसी केंद्रास महीलांचा उस्फुर्त प्रतिसाद
प्रभाग पाचमध्ये जनविकास सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून लक्ष्मीताई पवार व राम पवार यांचा स्तुत्य उपक्रम
जामखेड प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीच्या लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी मोफत करण्याची सुविधा जनविकास सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून प्रभाग पाचच्या इच्छुक उमेदवार लक्ष्मीताई पवार व भाजपा भटक्या मुक्त आघाडीचे प्रमुख राम पवार यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याबद्दल प्रभागातील माता भगिनींनी लक्ष्मीताई पवार व राम पवार यांचे आभार मानले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाखो पात्र महिलांना दर महिन्याला १,५०० रुपयांचा हफ्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जातो. आतापर्यंत मागील काही महिन्यांचे पैसे लाभार्थी महिलांना मिळालेही आहेत. आता लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता लाभार्थी महिलांना ई-केवायसी (Ladki Bahin Yojana E KYC)अनिवार्य करण्यात आली आहे. योजनेतील सर्व लाभार्थी महिलांना ईकेवायसी (Ladki Bahin Yojana E KYC) पूर्ण करावी लागणार आहे. महिला व बालविकास विभागाकडून त्यासंदर्भातील पोर्टल विकसित करण्यात आलं आहे.

ही प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत १८ नोव्हेंबर २०२५ आहे आणि जर हे न केल्यास लाडकी बहीण योजनेचे अनुदान थांबवले जाऊ शकते हीच अडचण लक्षात घेऊन आपल्या पाच नंबर प्रभागातील कोणतीही महिला वंचित राहू नये म्हणून मोफत ई-केवायसी केंद्र सुरू केले आहे. याचा लाभ दररोज शेकडो महिला घेत आहेत.
यावेळी बोलताना लक्ष्मीताई पवार म्हणाल्या की, प्रभाग पाच मधील एकही महिला ई-केवायसी पासून वंचित राहू नये म्हणून आम्ही हे मोफत केंद्र सुरू केले आहे. ज्या महिलांचे ई-केवायसी करायचे राहिले आहे त्यांनी स्वतः चे व पतीचे आधार कार्ड तसेच लिंक असणारा मोबाईल बरोबर आणावा. आपण आठ दिवस हे मोफत केंद्र चालू ठेवणार आहोत.

प्रभाग पाच हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असून जनविकास सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अध्यक्षा लक्ष्मीताई पवार व भाजपा भटक्या मुक्त आघाडीचे प्रमुख राम पवार यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवत आपल्या उमेदवारी साठी प्रबळ दावेदारी सिद्ध केली आहे. तसेच ते सभापती प्रा राम शिंदे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.
लक्ष्मीताई पवार व राम पवार यांच्या माध्यमातून अनेक वंचित गरजू लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनेचे लाभ मिळवून दिले तसेच अनेकांना जातीचे दाखले काढून दिले प्रभागातील जनतेसाठी दिवाळी फराळ याच बरोबर पदरमोड करत रस्त्यावर स्पीड ब्रेकर सह अनेक कामे मार्गी लावलेली आहेत. प्रभाग पाच मध्ये सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या लक्ष्मीताई पवार किंवा राम पवार यांनी नगरसेवक पदासाठी उभे राहावे आम्ही सगळे बरोबर आहोत अशी प्रभागातील जनतेची मागणी आहे.



