झिक्रिच्या सरपंच सौ. नंदाताई दत्ता साळुंके या राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित

जामखेड प्रतिनिधी

ग्रामिण भागाच्या झिक्रिच्या सरपंच सौ. नंदाताई दत्ता साळुंके राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी ध्यास घेऊन गावाची विकास कामे मार्गी लावली. याच आनुशंगाने कार्याचा गौरव म्हणून स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे वतीने देण्यात आलेल्या राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार २०२५ ने झिक्रीच्या सरपंच सौ. नंदाताई दत्ता साळुंके यांना सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे जामखेड तालुक्यातील एकमेव झिक्रीच्या सरपंच यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित, मान कतृत्वाचा..सन्मान नेतृत्वाचा राज्यस्तरीय सन्मान सोहळा २०२५ हा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी दिला जातो. याच अनुषंगाने झिक्री येथिल सरपंच सौ. नंदाताई दत्ता साळुंके यांनी अत्तापर्यंत आत्मविश्वासाने आणि जिद्दीने आपले ध्येय साध्य करीत कार्यक्षेत्रामध्ये खंबीरपणे उतुंग कामगिरी करुन समाजाचे कल्याण करण्यासाठी सतत धडपड केली. तसेच त्यांनी आपल्या झिक्री गावात प्रशासन तसेच ग्रामस्थांच्या मदतीने आपल्या गावात ग्रामपंचायत च्या माध्यमातून विविध योजनांच्या सहाय्याने सर्वसामान्य जनतेची विविध कामे मार्गी लावली. तसेच सरपंच सौ. नंदाताई साळुंके यांनी संघर्षातून मोठे यश मिळवले आहे. यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.

सरपंच सेवा संघाचे समर्थक बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वारखाली तसेच शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे साहेब, कालभक्त श्रीमहंत डॉ. श्रीकांतदास धुमाळ महाराज उज्जैन, ग्रामसेवक नेते एकनाथराव ढाकणे साहेब यांच्यासह दिग्गज मान्यवसरांच्या शुभहस्ते व यादवराब पावसे पाटील, रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने झिक्रीच्या  सरपंच सौ नंदाताई साळुंके यांना आदर्श सरपंच पुरस्काराने गुरूवार दि. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी माऊली संकुल सभागृह, सावेडी रोड, अहिल्यानगर याठिकाणी सन्मानित करण्यात आले. सरपंच सौ. नंदाताई दत्ता साळुंखे यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्या बद्दल मंगेश (दादा) आजबे मित्र परीवार, शंभुराजे कुस्ती संकुल, जामखेड व झिक्रि ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here