

देवदैठण येथील विजेचा प्रश्न न सुटल्यास महावितरणच्या कार्यालयास टाळे ठोकणार- मंगेश (दादा) आजबे
देवदैठणच्या भोरेवस्ती येथील वीजप्रश्नी महावितरण अधिकार्यांना ग्रामस्थांचा घेराव
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील देवदैठण येथील भोरे वस्ती एक महिन्यांपासून अंधारात आहे. तर गावातील ट्रान्सफॉर्मर मध्ये बिघाड झाल्याने दहा दिवसांपासून थ्री फ्येजची अडचण आहे. वस्ती वरील नागरिकांची संपूर्ण दिवाळी अंधारात गेली मात्र तरी देखील देवदैठण ग्रामस्थांचा विजेचा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे आज संतप्त झालेल्या शेतकर्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते मंगेश (दादा) आजबे यांच्या सह महावितरण कार्यालयास घेराव घातला.

देवदैठण येथील भोरेवस्ती डिपी दोन महिने झाले बंद पडली होती. यानंतर 2 ऑक्टोबर 2025 रोजी त्या ठिकाणी बसविण्यासाठी नवीन डीपी आली होती. मात्र केबल मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला होता. त्यामुळे देवदैठण येथील भोरेवस्ती येथील परीसर दोन महिन्यापासून अंधारात होता. याबाबत सर्व लोकप्रतिनिधी फोन करून महावितरणच्या अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधी फोनद्वारे ग्रामस्थांनी सांगितले होते. मात्र तरीही या ठिकाणी असलेला वीजेचा प्रश्न सुटला नाही. परीणामी देवदैठण येथील भोरे वस्तीवरील ग्रामस्थांची दिवाळी अंधारात गेली होती.

याबाबत ची माहिती देवदैठण येथील ग्रामस्थांनी शेतकर्यांच्या प्रश्नावर नेहमी आवाज उठवणारे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते मंगेश दादा आजबे यांची भेट घेऊन ही अडचण कारणावर घातली. यावेळी मंगेश आजबे हे ग्रामस्थांना घेऊन महावितरण चे अधिकारी यांच्याकडे गेले व घेराव घालत जाब विचारला. यावेळी ग्रामस्थांनी देखील अधिकार्यांन समोर संताप व्यक्त केला.

यावेळी मंगेश आजबे यांनी बोलताना सांगितले की जर उद्या पर्यंत देवदैठण येथील वीजेचा प्रश्न सुटला नाही तर महावितरण कार्यालयास टाळे ठोकले जाईल असा इशारा दिला. यानंतर जामखेड उपविभागीय कार्यालयाचे उपकार्यकारी अभियांता प्रदिप कटकधोंड यांनी सांगितले की आज सकाळी याठिकाणी आमचे कर्मचारी गेले आसुन त्या ठिकाणी वीज दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले आहे. आजच विजेचा प्रश्न मार्गी लागेल असे आश्वासन दिले.









