Home राजकारण जवळा जिल्हा परिषद गटातुन सौ. धनलक्ष्मी अजिनाथ हजारे प्रबळ दावेदार

जवळा जिल्हा परिषद गटातुन सौ. धनलक्ष्मी अजिनाथ हजारे प्रबळ दावेदार

जवळा जिल्हा परिषद गटातुन सौ. धनलक्ष्मी अजिनाथ हजारे प्रबळ दावेदार

राजकारणाच्या पटलावर एक नवा चेहरा

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद जवळा गट ओबीसी महिला साठी राखीव झालेला आहे. त्यामुळे समाजकारण, शिक्षण, अर्थकारणातील यशानंतर राजकारणातही हजारे दाम्पत्यास अधिक पसंती मिळत आहे. चेअरमन आजिनाथ हजारे यांनी त्यांच्या सौभाग्यवती धनलक्ष्मी हजारे यांना जवळा जिल्हा परिषद गटातून उभे करावे म्हणून कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर आग्रह धरला आहे. सभापती प्रा. राम शिंदे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आजिनाथ हजारे परिचित आहेत. जवळा जिल्हा परिषद गटातून आपल्या पत्नी धनलक्ष्मी हजारे यांना भाजपाकडून उमेदवारी साठी ते प्रयत्नशील आहेत. त्यांनीच उभे राहावे म्हणून जवळा गटातील बहुतेक मतदारांनी इच्छा व्यक्त केली जात आहे. राजकारणाच्या पटलावर एक नवा चेहरा समोर येत आहे.

आजिनाथ हजारे यांच्या विषयी थोडक्यात माहिती

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक ते २५०० कर्मचाऱ्यांना नोकरी देणारे ‘ज्योती क्रांतीमल्टीस्टेट’ चे संस्थापक अध्यक्ष आजिनाथ हजारे. दोन तपांच्या खडतर परिश्रमातून घडलेले हे नेतृत्व. कल्पकता, मेहनत, संघटन कौशल्य आणि सततच्या प्रयत्नातून आज चार राज्यांमध्ये ज्योती क्रांतीचा विस्तार वाढलाय. सामाजिक समतोल व विकास साधण्यासाठी अजिनाथ हजारे समाजकारणा बरोबरच राजकारणातही सक्रिय झाले आहेत.

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेयांच्या नेतृत्वाखाली जवळा जिल्हा परिषद गटातून आपल्या सौभाग्यवती धनलक्ष्मी हजारे यांच्या साठी जनमताचा कौल आजवण्याची त्यांची तयारी केली आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आजिनाथ हजारे यांनी मोठ्या कष्टातून आपले शिक्षण पूर्ण केले. पुढे ते जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून हजर झाले. शिक्षक म्हणून सेवा करताना गावातील शिक्षक मित्रांचे संघटन त्यांनी तयार केले. सर्वांच्या गृहलक्ष्मींना एकत्र करून २००० साली हजारे यांनी ज्योती क्रांती पतसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली. आज संस्था मल्टीस्टेट बँक बनली आहे. ४ राज्यात विस्तारलेल्या ज्योती क्रांतीच्या माध्यमातून अजिनाथ हजारे यांनी तब्बल २५०० लोकांना नोकरीची संधी दिली, तर ३५ ते ४०,००० लहानमोठे व्यवसाय करणाऱ्यांना अर्थसहाय्य करून स्वतःच्या पायावर उभे केले. ५०,००० महिलांना बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी अर्थसहाय्य केले.

विधानसभेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हास्तरावर पदाधिकारी म्हणून काम करीत आहेत. पक्ष संघटने करिता ठरवून दिलेल्या उपक्रमांमध्ये आजिनाथ हजारे हे नाव आघाडीवर राहिलेले आहे. प्रा.शिंदे यांच्याशी २००७ पासूनते निष्ठेने काम करीत आहेत.आजतागायत अजिनाथ हजारे यांनी पक्षाच्या चिन्हावर तालुकास्तरावरची निवडणूक लढवलेली नाही. यावेळी मात्र जिल्हा परिषदेच्या जवळा गटातून जनमताचा कौल आजमाविण्याची त्यांची तयारी केली आहे.

आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या सामाजिक जाणिवेतून हजारे यांनी मल्टिस्टेटची शाखा सुरू केलेल्या प्रत्येक गावात दरवर्षी माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या गुणवंतांचा गुणगौरव सोहळा सुरू केला. निरनिराळ्या स्पर्धात्मक परिक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव दिला.विद्यार्थी घडला पाहिजे, पिढी सुधारली पाहिजे, कुटुंबात रोजगार मिळाला पाहिजे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी कार्य केले. अशा विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उमटवत शेकडो लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारे कार्यसम्राट असलेल्या आजिनाथ हजारे यांनी आपल्या सौभाग्यवती धनलक्ष्मी हजारे यांच्या माध्यमातून जवळा जिल्हा परिषद गटातुन निवडणुक लढवावी असा कार्यकर्ते, मतदार व ग्रामस्थांचा आग्रह आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!