

जामखेड: सामाजिक कार्यात नेहमीच तत्पर सेवा करणारे व भाजपा युवा नेते व उद्योजक बांधखडक येथील केशव (अण्णा) वनवे यांना नुकताच नवराष्ट्र तर्फे दिला जाणारा जनसेवक 2025 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदरचा पुरस्कार हा आदर्श गावचे सरपंच पोपटराव पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व साईदीप मल्टीस्पेशालिटी चे अध्यक्ष डॉ. दिपक सर यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना अध्यात्म समाजसेवा व यशस्वी उद्योजक या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देण्यात आला.

कार्यक्रमा दरम्यान ग्रुप प्रेसिडेंट नो भारत माध्यम समूह चे श्रीनिवासराव, वरिष्ठ महाव्यवस्था नवभारत माध्यम समूह, सचिन फुलपगार सहाय्यक महाव्यवस्थापक नवभारत माध्यम समूह अविनाश कराळे, ब्युरो चिफ विरोधी सुहास देशपांडे व जामखेड तालुका प्रतिनिधी वसंत सानप हे उपस्थित होते.
भाजपा युवा नेते व उद्योजग बांधखडक येथील केशव (अण्णा) वनवे हे दूध संकलन केंद्र, एजेक्स मशीन तसेच स्टोन क्रेशरच्या माध्यमातून त्यांनी उद्योग धंद्यात उभारी घेतली आहे. 2007 पासून भाजपाशी व सभापती प्रा. राम शिंदे यांच्या बरोबर एकनिष्ठ राहून त्यांच्या मार्फत गावामध्ये 14 साखळी बंधाऱ्याच्या मार्फत पाण्याचा मुबलक साठा करून दिला. बांधखडक हे भौगोलिक दृष्ट्या मागासलेले कमी शिवार असलेले व ऊसतोड कामगारांचे गाव म्हणून ओळखले जात होते ते पुसण्याचे काम त्यांनी केले. गावचे रस्ते डांबरीकरणाने जोडून घेतले, तसेच सभामंडप, शाळा खोली, व अंगणवाडी महिला सबलीकरणाचे काम केले.

गावात आरोग्य विषयक अडचणी असल्यास सर्वांसाठी उपलब्ध असणार नेतृत्व म्हणून ओळख आहे. पक्षामध्ये काम करत असताना सलग तीन वेळा तालुका सरचिटणीस भाजपा ही जबाबदारी सांभाळली आहे. साधारणता 50 व्यक्तींचं कुटुंब एकत्रित सांभाळणे ही तारेवरची कसरत आहे परंतु त्यांनी परिसरात एकत्र कुटुंब पद्धती कशी असावी याचे उत्तम उदाहरण केशव (आण्णा) वणवे यांनी आपल्या परिसरामध्ये दाखवून दिले आहे. केशव आण्णा वणवे यांनी बांधखडक गावाला विकासाच्या वाटेवर आणून एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.

सामाजिक कार्यात नेहमीच तत्पर सेवा करणारे व भाजपा युवा नेते व उद्योजग बांधखडक येथील केशव (अण्णा) वणवे यांनी मागिल महीन्यात खुप मोठी अतिवृष्टी झालेली होती त्या ठिकाणी मदतीला धावून आले होते. मुसळधार पावसामुळे बांधखडक पूलाची व दरडवाडी पुलाजवळ पडलेले भगदाड मशनिरी लावुन स्वखर्चातून दुरुस्तीचे काम करुन दिले होते. संकटकाळात दोन्ही रस्ते दुरुस्ती करुन दिल्याने ग्रामस्थांनी देखील समाधान व्यक्त केले होते.






