


आरोपींनवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी – राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खांबाळकर
जामखेड प्रतिनिधी
जिल्हाअध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुबिंयावर झालेल्या भ्याड हल्ल्यातील सर्वच आरोपींना तातडीने अटक करावी. तसेच सर्व आरोपींनवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी आरपीआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खांबाळकर यांनी केली आहे. तसेच यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने वस्तू फेकून केलेला हल्ल्याचा निषेध देखील करण्यात आला.

जामखेड तालुक्यातील नान्नज येथे रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुबिंयावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व रिपब्लिकन, आंबेडकरवादी पक्ष व सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने जामखेड पोलीस स्टेशनवर भव्य एल्गार मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने माताभगिनी व तरूण उपस्थित होते.
रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांचे कुटुंबावर दि. २४ ऑगस्टला रोजी मध्यरात्री झालेल्या जीवघेणा भ्याड हल्ल्याचे निषेधार्थ दि. १२ ऑक्टोबर रोजी जामखेड येथे एल्गार मोर्चा सकाळी ठिक ११.०० वाजता रिपब्लिकन व आंबेडकरी पक्ष संघटनाच्या वतीने संविधान चौक ते पोलीस स्टेशन, जामखेड एल्गार मोर्चा आयोजित केला होता. यावेळी संविधान चौकात मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी संविधान चौकात जमा झाले व भव्य दिव्य मोर्चा पोलिस स्टेशन वर धडकला यावेळी हल्यातील सर्वच आरोपींना अटक करण्याची मागणी अनेकांनी केली.

यावेळी बोलताना विवेक भाई म्हणाले की, सध्या फक्त सहाच आरोपी अटक आहेत बाकी हल्यातील सर्वच आरोपींना अटक करावी तर आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे म्हणाले की, शासनाला जाब विचारण्यासाठी हा भव्य दिव्य एल्गार आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. याबाबत आपल्या मागण्यांमध्ये म्हंटल आहे. गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक करावी, गुन्ह्यातील आरोपींवर संघटीत गुन्हेगारी खाली (मोक्का अंतर्गत) गुन्हा दाखल करावा, साळवे कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे, साळवे कुटुंबावर झालेला हल्ला हा पूर्व नियोजित कट असल्याने कलम १२० ब लावावे व मुख्यसूत्रधारास अटक करावे, केस फास्टट्रँक वर चालवावी व विशेष सरकारी वकीलाची नियुक्ती करून सहा महिन्याच्या आत निकाल द्यावा.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे यांनी आंदोलन कर्त्यांशी चर्चा करताना सांगितले की सदरील घटनेतील आरोपी यांना तातडीने अटक करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पोलीस पथके तयार केले आसुन तातडीने आरोपींना अटक केले जाईल असे अश्वासन दिले.

यावेळी संपूर्ण जिल्ह्यातून आंबेडकरवादी जनता याच बरोबर विवेकभाई चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, प्रा. विकी घायतडक, संतोष गव्हाळे, विकास मासाळ, विशाल गव्हाळे, माजी सभापती सुभाष अव्हाड, आतिष पारवे, सतिश साळवे, शिवाजी साळवे, युवराज गायकवाड, बापू जावळे, अनिल जावळे, सुरेखा सदाफुले, बापुसाहेब गायकवाड, बाळासाहेब शिंदे, सुनिल जावळे, आशोक आव्हाड, बाबासाहेब कांबळे, डॉ. नरेंद्र जावळे, नागेश कांबळे, किरण दाभाडे, गणेश कदम, सतिष मगर, राजाभाऊ जगताप व विवेक भिंगारदिवे यांच्या सह अनेक माताभगिनी व तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.







