Home ताज्या बातम्या रत्नापुर परीसरातील शेतातुन दोन लाख रुपये कीमतीची गांजाची झाडे जप्त

रत्नापुर परीसरातील शेतातुन दोन लाख रुपये कीमतीची गांजाची झाडे जप्त

रत्नापुर परीसरातील शेतातुन दोन लाख रुपये कीमतीची गांजाची झाडे जप्त

जामखेड प्रतिनिधी

गांजाच्या गुन्ह्यात पकडलेल्या आरोपीकडे तपासा दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अधिक चौकशी केली असता आनखी दोन लाख रुपये किमतीची गांज्याची झाडे जप्त केली आहेत . आरोपीने रत्नापूर येथील एका शेतात आनखी गांजाची झाडे आहेत अशी माहिती दिली. यानंतर पोलीसांनी घटनास्थळी छापा टाकून दोन लाख रुपये कीमतीच्या गांजाची झाले जप्त केली आहेत . या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

जामखेड शहरासह तालुक्यात अवैद्य व्यवसायांवर पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलिसांनी कारवायांचा धडका चालू केला आहे. जामखेड शहरात १ लाख ९८ हजार १०० रुपये किंमतीचे २८.३० गांजा पोलिसांनी छापा टाकून पकडला आहे. यापुर्वी जामखेड येथील गांजाच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निलोन उर्फ कव्या धनसिंग पवार, वय ४२ वर्षे याला काही दिवसांपूर्वी अटक केली आहे. त्याच्याकडे पोलीसांनी चौकशी केली असता रत्नापूर परीसरातील विजय अशोक ढवळे याचे शेतात आनखी काही गांजाची झाडे आहेत अशी माहिती पोलीसांना दिली. यानंतर पोलीसांनी घटनास्थळी जाऊन शेतात छापा टाकला असता विजय अशोक ढवळे याच्या शेतातुन १ लाख ९८ हजार रुपये व किमतीची २८ कीलो वजनाची गांजाची झाडे पकडली आहेत.

सदर कारवाईनंतर पो. ना शामसुंदर जाधव यांच्या तक्रारीवरून जामखेड पोलीस स्टेशन गुरनं. ५४७/२०२५ एन.डी.पी.एस. कायदा १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) (ii) प्रमाणे आरोपी निलोन उर्फ कव्या धनसिंग पवार, वय ४२ वर्षे, निशा नितीन पवार, वय ३२ वर्षे, दोन्ही रा. कुंभार गल्ली, गोरोबा टॉकिज जवळ, जामखेड, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर यांचे विरुध्द दि ०९ ऑक्टोंबर २०२५ रोजी वर नमूद प्रचलित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे अहिल्यानगर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबमे, अहिल्यानगर व प्रविण लोखंडे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग कर्जत यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, पोलीस उपनिरीक्षका किशोर गावडे, पो. हे. कॉ सोनवणे, पो. कॉ ईश्वर माने, पो.कॉ भागीरथ देशमाने, पो. कॉ योगेश दळवी यांच्या पथकाने केलेली आहे. दोन दिवसांपूर्वीच जामखेड येथे स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर पथकाने कारवाई केली आहे. त्या कारवाईत अटक असलेल्या आरोपींवर पुन्हा या कारवाईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!