आ. रोहित पवारांचा वाढदिवसानिमित्ताने २ हजार डब्बे वाटप, कुसडगावचे माजी सरपंच बापूसाहेब कार्ले यांचा उपक्रम

जामखेड प्रतिनिधी

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वायफळ खर्चास फाटा देत कुसडगावचे माजी सरपंच बापूसाहेब कार्ले यांनी अभिनव उपक्रम राबवणार असून तालुक्यातील ३१ जिल्हा परिषद शाळा व १० अंगणवाड्यातील विध्यार्थ्यांना जेवणाचे सुमारे २ हजारवर डब्बे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

जामखेड तालुक्यात पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्यामुळे आमदार रोहित पवार यांनी वाढदिवस साजरा केला नाही तसेच सामाजिक बांधिलकीतुन मदत करण्याचे आवाहन केले होते,यास कुसडगावचे माजी सरपंच बापूसाहेब कार्ले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तालुक्यातील कुसडगाव,सरदवाडी,भोगलवाडी,डिसलेवाडी,खांडवी,झिक्री,धोंडपारगाव,राजेवाडी,पाडळी,खुरदैठण,सारोळा,काटेवाडी,शिऊर,फाळकेवाडी,बसरवाडी,सावरगाव ,मोहा,रेडेवाडी,हपटेवाडी,नाणेवाडी यासह १० आंगवाडीतील इयत्ता बालवाडी ते १० वी पर्यंतच्या विधार्थी विधार्थिनी सुमारे २ हजार जेवणाचे डब्बे व सुमारे २० हजार चॉकलेट वाटप करण्याचे नियोजन केले असून माजी सरपंच बापूसाहेब कार्ले हे राजकारणासह सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमे ते राबवत आहे विविध दिंड्या,पालख्या याना महाप्रसाद वाटप,गावातील शाळेंना वह्या पुस्तके वाटप,गोरगरिबांना धान्य वाटप यासह राहुल उद्योग समूहाच्या माध्यमातून सुमारे १०० ते १५० कामगाराचा उदरनिर्वाह त्यांनी उभा केला आहे,तसेच आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून तालुक्यातील राजकारणात ते सक्रिय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here