Home क्राईम न्यूज रेणुका कलाकेंद्रावर १७ जणाच्या जमावाचा हल्ला, तीन दिवसात दुसरी घटना, गुन्हा दाखल

रेणुका कलाकेंद्रावर १७ जणाच्या जमावाचा हल्ला, तीन दिवसात दुसरी घटना, गुन्हा दाखल

रेणुका कलाकेंद्रावर १७ जणाच्या जमावाचा हल्ला, तीन दिवसात दुसरी घटना, गुन्हा दाखल

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील मोहा येथे असलेल्या रेणुका कलाकेंद्रात दि. १० रोजी रात्रीच्या बाराच्या सुमारास अज्ञात १७ जणांच्या जमावाने तोंडाला रूमाल लावून तलवार, काठ्या, कोयते घेऊन आले. त्यांनी कलाकेंद्राच्या आवारातील दुचाकी व रिक्षा यांची तोडफोड केली तसेच गेटवर असलेल्या किराणा दुकानाचे काऊंटर फोडून कलाकेंद्रात प्रवेश करून तेथील होम थिएटर व लोकांना बसण्यासाठी ठेवलेल्या ५० खुर्च्याची तोडफोड केली. सुमारे वीस मिनिटे असा प्रकार चालू होता. सदर घटनेची माहिती पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली तोपर्यंत सर्व अज्ञात जमाव चारचाकी वाहनातून बीडच्या दिशेने निघून गेले. तीन दिवसांपूर्वी सदर रेणुका कलाकेंद्रावर आष्टी (जि. बीड) येथील तीन व जामखेड येथील एक जणांनी धुडगूस घातला होता.

याबाबत जामखेड पोलीसात ज्योती पवार (वय ४० वर्षे धंदा कलाकेंद्र, रा. रेणुका सांस्कृतीक लोकनाटक कला केंद्र, मोहा) यांनी फिर्याद दिली की, दि. ७ रोजी रेणुका कलाकेंद्रात शुभम लोखंडे, सतीश टकले, नागेश रेडेकर सर्व (रा. आष्टी जि. बीड) व अक्षय मोरे (चिंग्या) या आरोपींनी हातातील कोयत्याने रेणुका कलाकेंद्रातील खुर्च्या, टेबल व दोन चाकी मोटार सायकल स्कुटीची तोडफोड केलेबाबत व कलाकेंद्रातील नृत्यकाम करणारे मुलींची छेडछाड केलेबाबत याबाबत पहीला गुन्हा दाखल आहे.

दिनांक १० रोजी रात्री १२:१० वा. चे सुमारास रेणुका कलाकेंद्राच्या समोर तीन चारचाकी वाहने एका पाठोपाठ आल्या व त्यातील अनोळखी १७ इसम तोंडाला बांधून गाडीमधून खाली उतरून हातात काठ्या, तलवार, कोयते घेवून कलाकेंद्राचे आवारात लावलेले रिक्षा व तीन मोटार सायकल वाहनाची तोडफोड करून कलाकेंद्राचे गेटवर असलेले किराणा दुकानाचे काऊंटर फोडून कलाकेंद्रामध्ये आत शिरले व कलाकेंद्रामधील नृत्यकाम प्रॅक्टीस करणेसाठी ठेवलेले दोन होमथेटर व नृत्यकाम पाहण्यासाठी आलेल्या लोकांना बसण्यासाठी ठेवलेल्या ५० खुर्चाची तोडफोड करून कोल्हाटी खूप माजलेत चिंग्याच्या नादी लागू नका, त्याचा परिणाम भोगावा लागेल असे म्हणून घाणघाण शिविगाळ केली व परिसरात दहशत निर्माण केली. त्यांच्या भितीनी आम्ही कला केंद्राच्या एका रूममध्ये लपून बसलो व पोलीसांना फोन केला असता ते चारचाकी वाहनातून सौताडाच्या दिशेने पळून गेले. यावेळी पोलीसांना माहीती समजताच तात्काळ घटनास्थळी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी व त्यांचे सहकारी आले. ज्योती पवार यांच्या फिर्यादीवरून एकुण १७ जणांनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रवींद्र वाघ हे करीत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!