


जामखेड पोलीसांनी अवैद्य गुटख्याच्या मालाने भरलेला टॅम्पो पकडला, एकुण ५२ लाख ९४ हजार ६४० रु मुद्देमाल हस्तगत
जामखेड प्रतिनिधी
जामखेड पोलीसांनी जामखेड कर्जत रोडवरील आरणगाव शिवारात गस्त घालत असताना अवैद्य गुटख्याच्या मालाने भरलेला टॅम्पो पकडला. पोलीसांनी अवैध गुटखा व टॅम्पोसह एकुण ५२ लाख ९४ हजार ६४० रु मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामुळे जामखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आसुन पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.

याबाबत पोलिसांनकडुन मिळालेली माहिती अशी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी हे दि २७ सप्टेंबर रोजी रात्री जामखेड परीसरात आपल्या पथकासह गस्त घालत होते. यावेळी त्यांना गुप्त माहिती मिळाली की माहीजळगाव रोडने एक गुटख्याने भरलेला टॉम्पो जामखेडच्या दिशेने येत आहे. त्यानंतर पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्यासह रात्र गस्तीचे अधिकारी पोलिस उपनिरीक्षक किशोर गावडे, पो. कॉ. कुलदीप घोळवे, पो. कॉ. देविदास पळसे, चालक महादेव मिसाळ व होमगार्ड संदिप चव्हाण यांचे पथक कारवाईसाठी रवाना झाले.

पोलिस पथक हे जामखेड माहीजळ रोडवरील आरणगाव शिवारात गस्त घालत थांबले असता पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास एक संशयित अयशर टॅम्पो क्रमांक एम. एच १२, वाय. बी ०८२३ हा माहीजळगाव कडुन जामखेडच्या दिशेने जात असलेला दिसुन आला. यानंतर सदरचा टॉम्पो पोलीसांनी आडवुन एका पेट्रोल पंपाजवळ थांबवला व टॉम्पोची तपासणी केली असता टॅम्पो मध्ये ३४ लाख ९४ हजार ६४० रु कीमतीचा अवैद्य पान मसाला गुटखा व तंबाखूचा माल आढळून आला. पोलिसांनी १८ लाख रु कीमतीचा अयशर टॉम्पो व ३४ लाख ९४ हजार ६४० रु कीमतीचा अवैद्य गुटखा असा एकुण ५२ लाख ९४ हजार ६४० रु मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपी टॉम्पो चालक वैभव आशोक घायाळ वय २६ वर्षे. रा. गवळवाडी. ता. पाटोदा जिल्हा बीड. यास ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण लोखंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्यासह पथकाने केली आहे.





