जामखेड तालुक्याला अतिवृष्टीचा फटका, १७ घरांची पडझड, १ मेंढी, ७ शेळ्या व १ गायीचा मृत्यू.

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यात दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. तालुक्यातील खर्डा व धनेगाव भागातील अनेक गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. जवळा व खुरदैठण भागातील नदिच्या काही कुटुंबाला जर गरज पडली तर त्यांच्या स्थलांतराची सोय गावातील मंदिर, ग्रामपंचायत व शाळांमध्ये करुन ठेवली आहे. आशी माहिती तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांनी दिली आहे. तसेच काल २६ रोजी तालुक्यात १७ घरांची पडझड १ मेंढी व १ गायीचा मृत्यू झाला आहे. तर आज दि २७ रोजी लेन्हेवाडी येथे ७ शेळ्यांचा मृत्यू झाला आहे.

दोन दिवसापूर्वी निर्माण झालेली सारखी पुरपरस्थिती पून्हा ओढावली आहे. दि २६ सप्टेंबर रोजीच्या मध्यरात्री विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यात कहर केला आहे. सध्या शहरासह तालुक्यात सातही महसुल मंडळात पाऊस चालूच आहे. खर्डा, जवळा, लोणी, मोहरी, दिघोळ, बांधखडक लोणी आनंदवाडी जायभायवाडी तेलंगशी व धनेगाव भागात मोठय़ा प्रमाणावर नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

आज दि २७ रोजी मुसळधार पावसामुळे खैरी नदीला पूर आल्याने दरडवाडी येथिल पुलावरून पुन्हा पाणी वहात होते त्यामुळे काही काळ जामखेड ते खर्डा रस्ता बंद झाला होता. मात्र दुपारी पाणी कमी झाल्याने पुन्हा वहातुक सुरळीत झाली. तसेच आनंदवाडी ते बांधकाम येथील पुलावरून पणी गेल्याने देखील वहातुक बंद होती.

जवळा व खुरदैठण या गावात तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांनी भेट देऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. जवळा ग्रामपंचायत प्रशासनाने आवाहन केले आहे की जवळा गावातील नांदणी नदी व सिना नदीच्या कडेला असलेल्या सर्व वस्त्या व घरे यांना सूचित करण्यात येत आहे की पाण्याचा प्रवाह वाढत आहे. गावातील मारुती मंदिर परिसर, कुंभार गल्ली, वाळुंजकर गल्ली, भीमनगर, मातंग वस्ती येथील नागरिकांची “श्री. जवळेश्वर मंदिर भक्त निवास” व “नवीन ग्रामपंचायत” येथे राहण्याची सोय केली आहे. नागरिकांनी तेथे जाऊन थांबावे. तसेच खुरदैठण येथे देखील नदिच्या काठावरील लोकांना वेळ पडल्यास गावात राहण्याची सोय प्रशासनाने केली आहे.

प्रशासनाने काल दि २६ सप्टेंबर रोजी तालुक्यातील विविध ठिकाणी झालेल्या नुकसानीची माहिती दिली. यामध्ये भवरवाडी येथील पोपट अण्णा शिंदे यांची गाय नदित वाहुन गेली तर मोहा येथे कैलास सजगणे यांची एक मेंढी ओढ्याच्या पाण्यात वाहुन गेली. तसेच घोडेगाव खुरदैठण मोहरी राजुरी शिऊर मुंजेवाडी वंजारवाडी तरडगाव वाघा आशा विविध ठिकाणी घरांची पडझड झाली तर अनेक घरात पाणी शिरले असल्याने जिवनावश्याक वस्तुंचे नुकसान झाले आहे.

जामखेड शहरात नजिक असलेल्या लेहनेवाडी येथे आज दि २७ रोजी पहाटे मुसळधार पावसामुळे शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. येथील शेतकरी शरद प्रभाकर पवार यांच्या ७ शेळ्या पावसाच्या पाण्यामुळे मृत्यूमुखी पडल्या आहेत. यावेळी माहिती सांगताना पवार यांना अश्रु आणावर झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here