


दुसर्या दिवशीही अतिवृष्टीचा फटका, ३३ घरांची पडझड, ७ जणांनावरांचा, ९ शेळ्या व १४५ कोंबड्यांचा मृत्यू
पिंपळगाव उंडा येथे भिंत कोसळून वृध्द महीलेचा मृत्यू
जामखेड प्रतिनिधी
दुसर्या दिवशीही जामखेड तालुक्यातील आनेक गावात अतिवृष्टीचा फटका बसला आहे. काल दि २७ रोजी जामखेड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ३३ घरांची पडझड झाली आसुन ७ जणांनावरांचा तर ९ शेळ्या व १४५ कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच मध्यरात्रीच्या सुमारास पिंपळगाव उंडा येथे भिंत कोसळून एका वृध्द महीलेचा मृत्यू झाला आहे.

जामखेड तालुक्यात अनेक दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे संपुर्ण जामखेड तालुक्यातील नद्यांना पुर आले आहेत. गेल्या पन्नास वर्षांत आशी भिषण परिस्थिती निर्माण झाली नव्हती, गेली अनेक दिवसांपासून सुरू असलेला पाऊस अजूनही काही दिवस सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे नद्यांना पूर येऊन त्या रस्त्यावरील पुलावरून पाणी जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

सीना व तिच्या उपनद्यांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्याने रविवारी पुन्हा एकदा सीनानदीला महापुर आला. सीना नदीच्या पुराने सर्व रेकॉर्ड ब्रेक करत रौद्ररूप धारण केले आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या चोंडी गावाला सीना नदीच्या महापुराचा वेढा पड़ला आहे. शिंदे यांच्या बंगल्या भोवती गुडघाभर पाणी साचले आहे. चोंडीला चोहोबाजूने महापुराचा वेढा पडला आहे. अनेक घरात पाणी शिरले आहे. पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

काल शनिवार दि २७ रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेती बरोबरच घरांचे देखील नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे ३३ घरांची पडझड झाली आसुन ७ जणांनावरांचा तर ९ शेळ्या व १४५ कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे आशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
शनिवार दि २७ रोजी रात्री साडेअकरा किसन गव्हाणे व पारूबाई किसन गव्हाणे हे वृध्द पती पत्नी आपल्या पत्र्याच्या घरात झोपले होते. सतत पाऊस चालू असल्याने शेजारच्या जून्या इमारतीचा भींतीचा भाग त्यांच्या पत्र्याच्या घरावर कोसळला. त्यात मयत पारूबाई गंभीर जखमी झाल्या त्यांना तातडीने रात्री बारा वाजता जामखेड येथील समर्थ हॉस्पिटलला उपचारासाठी आणले असता त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले. त्यांनंतर ग्रामीण रुग्णालयात डॉ. शशिकांत शिंदे यांनी रात्रीच शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. दरम्यान पिंपळगाव उंडा येथील उपसरपंच गणेश जगताप यांनी घटनेची माहिती सर्कल इकडे मॅडम यांना दिली होती.







