

संघर्षातून घडलेले कार्यकर्तेच समाजाला दिशा देतात- युवा नेते अण्णासाहेब ढवळे
जामखेड (प्रतिनिधी)
समाजासाठी लढणाऱ्यांचाच सन्मान होतो हे पुन्हा अधोरेखित करत विश्वकर्मा वंशिय समाज संघटनेच्या जामखेड तालुकाध्यक्षपदी आनंद राजगुरू यांची व महाराष्ट्र राज्य कुंभार समाज महासंघाच्या जामखेड तालुकाध्यक्षपदी गणेश मेंढकर यांची निवड झाली आहे. तसेच भाजपा शिक्षक सेलच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी प्रा. संजय राऊत यांची निवड झाल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली.

या निवडी बद्दल युवा नेते अण्णासाहेब ढवळे यांच्या हस्ते या तिन्ही नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ढवळे म्हणाले की, पदं मिळवण्यासाठी धडपडणारे अनेक असतात, पण समाजासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांची निवड म्हणजेच खरी ताकद. आनंद राजगुरू व गणेश मेंढकर यांच्या निवडीमुळे संघटनेला नवा लढाऊ चेहरा मिळाला आहे. येत्या काळात जामखेड तालुक्यातून समाजाच्या विकासासाठी साठी अधिक जोमाने पावले उचलली जातील, यात मला शंका नाही. तसेच प्रा. संजय राऊत यांच्या नेतृत्वामुळे जिल्ह्यातील शिक्षक वर्गाचा आवाज प्रभावीपणे मांडला जाईल. आगामी काळात समाजातील प्रश्नांवर भक्कम आवाज उठवण्यासाठी आणि संघटनेची ताकद वाढवण्यासाठी आनंद राजगुरू, गणेश मेंढकर व प्रा. संजय राऊत यांचे नेतृत्व निर्णायक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.. 
सदर प्रसंगी संत गोरोबा काका पतसंस्थेचे चेअरमन विनायक राऊत, प्रा.जाकीर शेख सर, अवधूत पवार, युवा नेते गणेश वारे, प्रवीण बोलभट, जमीर सय्यद, आबासाहेब साळुंखे, गणेश हगवणे, भैय्या परदेशी, योगेश नाना घायतडक, नितीन शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.








