

संतोष सुरवसे यांना पंडीत दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ कडून डॉक्टरेट पदवी जाहीर
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील छोट्याशा खेडेगावातील धामणगाव येथील शेतकरी पुत्र संतोष धोंडिबा सुरवसे यांच्या शिरपेचात सरोच्च मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. नवी दिल्ली येथील प्रसिद्ध रेडिसन ब्लू हॉटेल येथे पडलेल्या दिमाखदार समारंभात हा सन्मान सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते संतोष धोंडिबा सुरवसे यांना हा गौरव प्रदान करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरामध्ये पद्मश्री डॉ अरविंद कुमारजी (कुलगुरू राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी महाविद्यालय) जामखेड डॉ. इंदू भूषण मिश्राजी (कुलगुरू पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ मथुरा उ प्रदेश) डॉ. ऋतू दुबै तिवारीजी (ज्येष्ठ साहित्यिक गाजियाबाद) डॉ. शिवाजी रामभाऊ शिंदे (सदस्य रेल मंत्रालय भारत सरकार) तसेच डॉ. विश्वनाथ पाणिगृहजी (राष्ट्रीय पर्यावरण वर्ल्ड रेकॉर्ड धारक छत्तीसगड) या सर्व मान्यवरांच्या हस्ते संतोष धोंडिबा सुरवसे यांना कृषी विकास व देशी गो संवर्धन या कार्याबद्दल मनपूर्क कौतुक करत समाजाला योग्य दिशा व मार्गदर्शन देण्याचे कार्य पुढेही अविरत पणे चालू राहील असा विश्वास व्यक्त केला.

संतोष सुरवसे हे केवळ कृषी विकास व देशी गोवंश संवर्धन एवढेच करत नसून पुढेही आपण समाजाचे काही तरी देणे लागतो म्हणून समाजातील वंचित व उपेक्षित घटकांसाठी असे भरीव कार्य करत आहेत. गरजूंना विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप , फराळ वाटप, हिवाळ्यात उबदार ब्लँकेट कपडे वाटप, तसेच विविध प्रकारचे उपक्रम स्वच्छता, दीपावली मध्ये पंचगव्य शाही अभ्यंगस्नान, वृक्षारोपण रक्तदान शिबिर व आरोग्य शिबीर असेल असे त्यांच्या ह्या बहुआयामी कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठ ने घेतली आहे. या सन्मानामुळे राज्यभरातून तसेच विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.

कृषी विकास एवं गो संवर्धन क्षेत्रातील या मानाच्या गौरवामुळे महाराष्ट्र राज्य जामखेड तालुक्यातील छोट्याशा खेडेगाव धामणगाव मधील सामान्य कुटुंब तील शेतकरी पुत्राचा सन्मान झाल्याबद्दल मानाचा तुरा शिरपेचात रोवला गेला आहे. यावेळी डॉ संतोष धोंडिबा सुरवसे म्हणाले की हा सन्मान माझा एकट्याचा नसून तो माझ्या वर प्रेम करणारे सामाजिक कार्यात सदैव साथ देऊन पाठीवर थाप देऊन लढ म्हणणारे माझे मार्गदर्शक मित्र सहकारी हितचिंतक परिवार या सर्वांचा हा सन्मान आहे.







