जामखेडमध्ये प्रतिष्ठीत व्यवसायिकाच्या तरूण मुलाची आत्महत्या, सर्वत्र हळहळ; पोलीसांचा तपास चालू:

जामखेड प्रतिनिधी

जामखेडमधील प्रतिष्ठीत व्यवसायिक नाजीम काझी यांच्या मुलांने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दूर्दैवी घटना घडली आहे. दि १३ सप्टेंबर रोजी सकाळी जामखेड शहरातील नुराणी कॉलनी परिसरात घोडके हाँस्पीटलच्या पाठीमागे असलेल्या घरात अमन नाझीमोद्दीन काझी वय २३ वर्षे या तरुणाचा मृत्यूदेह घरातील पंख्याला दोरीच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. यावेळी त्याच्या हाताची नस कापलेली दिसून आली. प्रथम या तरुणाने हाताची नस कापली व नंतर घरातील पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आत्महत्यांचे स्पष्ट कारण अद्याप समजू शकलेले नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की जामखेड शहरातील नुराणी कॉलनी याठिकाणी अमन नाझीमोद्दीन काझी हा नेहमी प्रमाणे आपल्या बंगल्यात झोपण्यासाठी गेला होता. यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास त्याने प्रथम आपल्या हाताची नस कापली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आसुन यानंतर घरातील छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

मयत अमन काझी यांचे कुटुंब खर्डारोड याठिकाणी रहात आहे. तर तो एकटा नुराणी कॉलनी याठिकाणी आपल्या बंगल्यावर रात्री झोपण्यासाठी जात असे मात्र दि १३ रोजी दिवशी सकाळी १० वाजले तरी अमन हा खर्डा रोडवरील घरी का आला नाही म्हणून त्यांच्या आईने फोन लावण्याचा प्रयत्न केला मात्र तो फोन उचलला जात नसल्याने त्यांच्या वडीलांनी नुराणी कॉलनी याठिकाणी असलेल्या घरी जाऊन पाहिले. त्यावेळी दार उघडेच होते तर त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसुन आला.

सरद घटनेची माहिती जामखेड पोलीस स्टेशनला देण्यात आली यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले. अमन यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.मयत अमन या तरूणाने नेमकी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.अमनचा मोबाईल फोन पोलिसांकडे आहे फोनचे लाँक उघडल्यानंतर या घटनेचे काही कारण समोर येत आहे का हे पाहिले जाईल. या घटनेचे कारण शोधण्याचे काम पोलिस करत आहेत असे पोहेकाँ प्रविण इंगळे यांनी सांगितले. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पोहेकॉ प्रविण इंगळे हे करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here