

विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या जामखेड तालुका अध्यक्षपदी आनंद राजगुरू यांची निवड.
जामखेड प्रतिनिधी
विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या जामखेड तालुका अध्यक्षपदी आनंद राजगुरू तर उपाध्यक्षपदी संजय बनगे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रसाद गडकर यांनी दिली. विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या अहिल्यानगर जिल्हा शाखेची बैठक रविवार दि. ७ सप्टेंबर रोजी जामखेड येथील केशर हॉलमध्ये झाली. त्यावेळी ही घोषणा करण्यात आली.

संघटनेचे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख भगवान राऊत, विभागीय अध्यक्ष राजकुमार राऊत, माजी राज्य सचिव भाऊसाहेब राऊत, विभागीय अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, जिल्हा कार्याध्यक्ष आदिनाथ भालेकर, जिल्हा सचिव अशोक गोरे, माजी जिल्हाध्यक्ष रावसाहेब मोरे, जिल्हा प्रवक्ता सुभाष तमानके, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर राऊत, उत्तर जिल्हा प्रमुख संतोष शेंडगे, जिल्हा संपर्कप्रमुख गोकुळ गाडेकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गणेश सोनवणे, अहिल्यानगर शहर उपाध्यक्ष अमृत क्षीरसागर, जामखेड तालुका कार्यकारिणीचे मार्गदर्शक ह.भ.प. पंढरीनाथ महाराज राजगुरू, सल्लागार दिलीप कुमार राजगुरू यांच्यासह जामखेड तालुक्यातील पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते.

विश्वकर्मा समाज संघटनेची जामखेड तालुका कार्यकारणी पुढील प्रमाणे आनंद राजगुरू तालुकाध्यक्ष, रंगनाथ राजगुरू तालुका कार्याध्यक्ष, संजय बनगे व गणेश गवळी तालुका उपाध्यक्ष, दिलीप क्षीरसागर खजिनदार, प्रल्हाद राजगुरू सचिव, संतोष क्षीरसागर सहसचिव, अंकुश राजगुरू व गणेश सुतार तालुका संघटक, सतीश राजगुरू मीडिया प्रमुख, निलेश मोरे प्रसिद्धी प्रमुख, गोविंद जिरेकर तालुका संपर्कप्रमुख, तर सदस्यपदी अरुण सोळसकर, राम राजगुरू, गणेश क्षीरसागर, नारायण राजगुरू, सोमनाथ सुतार, संतोष क्षिरसागर, विनोद राजगुरू, विशाल राजगुरू, दत्तात्रय क्षिरसागर, भाऊसाहेब गाडेकर, सतिश सरोदे, मंगेश राजगुरू यांची निवड करण्यात आली.

जामखेड तालुका नूतन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र व गुलाब पुष्प देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते येथे सत्कार करण्यात आला. येत्या बुधवार दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी श्री क्षेत्र वेरुळ येथे होणाऱ्या विश्वकर्मा पूजन दिन व विश्वकर्मा वंशीय समाज बांधवांच्या राज्यस्तरीय मेळाव्यास सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आले. सूत्रसंचालन विनायक राऊत यांनी केले.








