वेरुळ येथील दि १७ रोजीच्या विश्वकर्मा पूजन दिन व विश्वकर्मा वंशीय समाजाच्या महामेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहा-आनंद राजगुरू

जामखेड प्रतिनिधी

विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेतर्फे वेरूळ येथे दि १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी सुतार, लोहार, सोनार, शिल्पकार, ताम्रकार या शिल्पिसमूहातील विश्वकर्मीयांचा महामेळावा व विश्वकर्मा पुजन दिन आयोजित करण्यात आले आहे. तरी या मेळाव्यास जामखेड तालुक्यातुन जास्तीत जास्त विश्वकर्मा वंशीय समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जामखेड येथील विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे नवनिर्वाचित जामखेड तालुका अध्यक्ष आनंद राजगुरू यांनी केले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ याठिकाणी दि १७ सप्टेंबर, २०२५ रोजी विश्वकर्मा वंशीय समाजाचा वार्षिक महामेळावा वेरूळ येथील विश्वकर्मा मंदिरात दरवर्षी आयोजित केला जातो; या वर्षीचा महामेळावा १७ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे, ज्यात समाजाचे लोक राज्यभरातून सहभागी होतात आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शिक्षण चिंतन प्रबोधन आणि संघटन यातुन समाज हीताचे संवर्धन करणे, एकत्रिकरण करणे, विश्वकर्मीय बांधवांचे न्याय हक्क प्रस्थापित करणे व राजकीय सामाजिक ताकद निर्माण करण्यासाठी हा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.

एक दिवस सामाजिक महाचळवळी मध्ये विश्वकर्मीय बांधव म्हणुन एकत्रीत येऊन उभे राहुयात तसेच यावेळी रक्तदान शिबीर देखील आयोजित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सुतार समाज्याचे प्रलंबित प्रश्न, शासनाच्या योजना व रोजगार याबाबत मोलाचे मार्गदर्शन या मेळाव्यात करण्यात येणार आहे. त्यामुळे यामेळाव्यास जामखेड तालुक्यातुन जास्तीत जास्त विश्वकर्मा वंशीय समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जामखेड येथील विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे नवनिर्वाचित जामखेड तालुका अध्यक्ष आनंद राजगुरू यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here