Home क्राईम न्यूज कोयत्याने मारहाण करीत केली पानटपरीची मोडतोड, दहा जणांनवर गुन्हा दाखल, नान्नज येथे...

कोयत्याने मारहाण करीत केली पानटपरीची मोडतोड, दहा जणांनवर गुन्हा दाखल, नान्नज येथे परस्पर विरोधात गुन्हा दाखल

कोयत्याने मारहाण करीत केली पानटपरीची मोडतोड, दहा जणांनवर गुन्हा दाखल, नान्नज येथे परस्पर विरोधात गुन्हा दाखल

जामखेड प्रतिनिधी

नान्नज येथे भांडण सोडण्यास गेल्याच्या कारणावरून कोयता, लोखंडी गज व बांबूने मारहाण करीत पान टपरिचे नासधुस नूकसान केले. या मारहाणीत दोनजण जबर जखमी झाले असून याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला १० जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नान्नज मारहाण प्रकरणी आता परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की दि २४ ऑगस्ट सुनिल साळवे यांच्या कुटुंबातील सदस्यांवर टोळक्याकडुन हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी १४ जणांविरोधात खुनाचा प्रयत्न करणे आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी कीही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर या प्रकरणात कोठडीत आसलेल्या वैभव साबळे यांने देखील सुनिल साळवे सह १० जणांविरोधात फीर्याद दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणी सुनील साळवे, यशदिप साळवे (पूर्ण नाव माहीत नाही) अभिजीत संपत साळवे, सतिश अजिनाथ साळवे, अरविंद भालेराव, (पूर्ण नाव माहीत नाही), आदर्श साळवे(पुर्ण नाव माहीत नाही ), सद्दाम पठाण (पुर्ण नाव माहीत नाही ),अभिजित साळवे (पुर्ण नाव माहीत नाही ), रतन साळवे (पुर्ण नाव माहीत नाही ) शिवानी साळवे (पुर्ण नाव माहीत नाही ), सर्व रा. नान्नज ता जामखेड असे दहा आरोपींचे नाव आहेत.

जामखेड तालुक्यातील नान्नज येथे रविवार २४ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १०.३० वाजेसुमारास फिर्यादी
वैभव विजय साबळे व त्याचा मित्र अभयराजे भोसले असे दोघेजण पानटपरी वरती बसले होते. त्यावेळी गावातील दिग्विजय आबु सोनवणे हा पानटपरी जवळ आला. व अभय सोबत भांडू लागला. त्यावेळी फिर्यादीने त्या दोघाचे भांडण सोडवले. त्यानंतर दिग्विजय याने इतर आरोपींना बोलावून घेतले. यावेळी आरोपींच्या हातात लोखंडी गज कोयता बांबू असे हत्यारे होती. या आरोपींनी फीर्यादीला हातातील हत्यारांनी मारहाण करत गळ्यातील चेन काढून घेतली. यानंतर आरोपीच्या घरातील महिलांनी फिर्यादीच्या पानटपरीवर दगडफेक करून मोडतोड केली. या मारहाणीत वैभव विजय साबळे व अभयराजे भोसले जख्मी झाले आहेत.

यानंतर फिर्यादी घरी गेले असता इतर आरोपींनी घरासमोर आरडाओरड करत शीवीगाळ करत निघून गेले. याप्रकरणी सुनील साळवे यांच्यासह दहा जणांविरोधात गून्हा दाखल करण्यात आला आहे. पूढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे. कॉ संजय लोखंडे हे करीत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!