

धानोरा येथे पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा विहिरीत बुडुन मृत्यु
जामखेड प्रतिनिधी
अहिल्यानगर येथुन जामखेड तालुक्यातील धानोरा या ठिकाणी आपल्या नातेवाईकडे आलेल्या आवेज रिजवान पठाण वय १७ वर्षे या मुलाचा विहिरीतील पाण्यात बडुन मृत्यू झाला. आवेज हा आज सकाळी मित्रांसोबत विहिरीवर पोहण्यासाठी गेला होता या वेळी ही दुर्घटना घडली. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मयत आवेज रिजवान पठाण वय १७ वर्षे रा. बोल्हेगाव, अहिल्यानगर हा काल दि ४ रोजी जामखेड तालुक्यातील धानोरा या ठिकाणी मामेबहीणीच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त आला होता. रात्री वाढदिवस झाल्या नंतर आवेद हा त्याचा चुलत भाऊ व मित्र त्या रात्री मुक्कामासाठी धानोरा या ठिकाणी आपल्या नातेवाईकडे थांबले होते. यानंतर दुसर्या दिवशी गुरवार दि 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी आठ वाजण्याच्या आसपास आवेद हा आपला चुलत भाऊ अन्वर शौकत पठाण व जय संतोष आरु असे तीघेजण धानोरा येथिल घराजवळील विहीरीवर पोहायला गेले होते.

यावेळी मयत आवेज याचा चुलभाऊ व मित्र हे विहिरीमध्ये पोहुन वरती आले होते. यावेळी आवेज हा त्यांना म्हणाला की मला पण पोहता येते असे म्हणुन विहीरीत उडी मारली. मात्र विहीरीत उडी मारल्या नंतर आवेज हा पाण्याच्या वरती आला नाही म्हणून त्याचा चुलत भाऊ व मित्र या दोघांनी मोठ्याने आरडाओरड केला. यावेळी आवाज एकुण वस्तीवरील नातेवाईकांनी विहिरीकडे धाव घेतली. यानंतर पोलीस पाटील योगिनाथ जायभाय यांना फोन द्वारे माहीती दिली, यानंतर पोलीस पाटील यांनी ही घटना जामखेड पोलीस स्टेशन व महसूल विभागास कळवली.

पिंपरखेड येथील रफीक अब्बास सय्यद वय 54 यांनी 23 फुट खोल पाण्यात बुडी घेऊन अवेज याचा मृतदेह पाण्याच्या वरती काढला. सकाळी आठ वाजता बुडालेल्या आवेजचा मृतदेह दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बाज पाण्यात उलटी टाकुन त्यावर मृतदेह ठेऊन दोरीच्या सहाय्याने मृदतेह पाण्यातुन विहिरीच्या बाहेर म्हणजे तब्बल सहा तासांनी बाहेर काढण्यात आला.
यावेळी मृतदेह काढण्यासाठी त्यांना घटनास्थळी वाजिद पठाण, हरीदास शिरगिरे, माजी सरपंच बालाजी शिंदे, भाऊराव काळे, लाला शिंदे, बाबुराव वाघ, सिकंदर शेख, सलीम शेख यांनी त्यांना मदत केली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक पुष्कर कडु स. पो. उपनिरीक्षक सलिम शेख, पो. कॉ. जितेंद्र सरोदे, योगेश दळवी, मंडल अधिकारी विजय चव्हाण, पोलीस पाटील योगिनाथ जायभाय, यांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. या प्रकरणी निजाम गणी शेख, रा. धानोरा यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरी वरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.







