

कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापार्यांनकडुन पाच दिवस व्यवहार बंद
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी घेतला निर्णय
जामखेड प्रतिनिधी
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदान याठिकाणी गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषणास बसले आहेत. यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठा बांधव हे मुंबईकडे दाखल होत आहेत. मात्र अद्यापही सरकारने याकडं लक्ष दिले नसल्याचे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. याच अनुषंगाने जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापार्यांनकडुन ३ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर २०२५ आशी पाच दिवस आपले व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत चे निवेदन कृषी उत्पन्न बाजार समिती व तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मंबई येथिल आझाद मैदान याठिकाणी आमरण उपोषणास बसले आहेत. गेल्या चाळीस वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळे मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे. सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून मराठा बांधव मुंबई या ठिकाणी येत आहेत व परीसरात ठीक ठिकाणी आंदोलन करीत आहेत. गेल्या चार दिवसांपासून या उपोषणावर कसलाही तोडगा निघाला नाही.. 
याच अनुषंगाने मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी जामखेड तालुक्यातुन देखील हजारो बांधव पाठिंबा देण्यासाठी मंबई याठिकाणी गेले आहेत. तसेच आंदोलकांना देखील लागेल ती मदत पोहच करण्यात येत आहे. याच अनुषंगाने जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापार्यांन कडुन ३ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर २०२५ आशी पाच दिवस आपले व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत चे निवेदन कृषी उत्पन्न बाजार समिती व जामखेड चे तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

यावेळी बाजार समितीचे सभापती पै.शरद कार्ले, उपसभापती पै. नंदूआबा गोरे, सचिव वाहेदभाई सय्यद बबन हुलगुंडे यांच्याकडे देखील निवेदन देण्यात आले. तहसीलदार यांना निवेदन देता वेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमेश जरे, उपाध्यक्ष सशिल बेदमुथ्था, सचिव मारुती काळदाते माजी संचालक भागवत पवार, विनोद नवले, सुभाष भंडारी त्रिंबक कुमटकर, संजय चोभारे, संजय टेकाळे, दादा भोईटे, सचिन कार्ले, काका नेटके, रावसाहेब नेटके, विशाल नेटके, राजेंद्र सांगळे, पिंटुशेट खाडे, बाळासाहेब डोके, संदिप दहिकर, भाऊ खाडे, सुभाष खाडे, निलेश डोके, सुनिल खैरे, संदिप भंडारी, दत्ता बोराटे, भरत शिंदे, कांतीलाल जरे, रावसाहेब आजबे, उपस्थित होते. यावेळी व्यापार्यांनी भगवी टोपी, भगवा रुमाल घालून घोषणा देत मोटार सायकल रॅली काढली.







