खर्डा परीसरात स्थानिक गुन्हे शाखा व खर्डा पोलीस यांची धडक कारवाई! विक्रीसाठी घेऊन जात असलेला गांजा पकडला

आरोपी कडुन साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील खर्डा परीसरात तरडगाव फटा या ठिकाणी दोन तरुण मोटारसायकलवर गांजा विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने व खर्डा पोलीसांच्या पथकाने संयुक्त कारवाई करित दोन आरोपींन कडुन 9.854 किलोग्रॅम गांजा जप्त करित मोटारसायकलसह साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात अंमली पदार्थाविरुद्ध कठोर लढाई छेडणाऱ्या पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. टास्क फोर्स नोडल अधिकारी पो.नि. किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पो.उप नि अनंत सालगुडे, समीर अभंग, हृदय घोडके, संतोष खैरे, गणेश लबडे, श्यामसुंदर जाधव, मनोज साखरे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर व चालक महादेव भांड यांनी खर्डा पोलीस स्टेशन हद्दीत माहीती घेतली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुप्त बातमीदाराने हिरो सीडी डिलक्स मोटारसायकल (MH-16-B-2550) वरून तरडगांव फाट्याहून गांजा विक्रीस नेला जात असल्याची माहिती दिली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. कबाडी यांनी खर्डा पोलीस स्टेशनला याबाबत कळवले. खर्डा पोलीस स्टेशनचे सपोनि उज्वलसिंह राजपुत, संभाजी शेंडे, शेषराव म्हस्के, बाळु खाडे, धनराज बिराजदार व शकिल बेग यांच्यासह संयुक्त पथकाने तरडगांव फाट्यावर सापळा रचला. व आरोपींची मोटारसायकल थांबवुन तपासणी केली. तसेच त्यांचे नावे विचारली असता सचिन नवनाथ गायकवाड वय- 25 वर्षे रा. पिंपरखेड, ता.जामखेड, जि. अहिल्यानगर, व सुक्षय उर्फ सोमा सुनिल काळे, वय-23 वर्षे रा. खर्डा, ता. जाखेड, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.

पोलिसानी तपासणी करित आसताना गोणीतील हिरवट पाने, फुले, बोंडे असलेला 9.854 किलो गांजा मिळाला. सदरचा गांजा आरोपींनी सुभम घुंगरे (रा. माहीजळगांव, ता. कर्जत) याच्याकडून विक्रीस असल्याचे कबूल केले. सध्या घुंगरे हा आरोपी फरार आहे. आरोपींच्या ताब्यातुन 2 लाख 45 हजार 475 रु कि.चा 9.854 कि.ग्रॅम अंमली पदार्थ गांजा, 30 हजार रु कि.चे दोन मोबाईल, एक हजार रु कि.ची रोख रक्कम, सत्तर हजार रु कि. ची एक मोटार सायकल असा एकुण 3 लाख 46 हजार 475 रु कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी खर्डा पोलीस स्टेशनला पो.ना श्यामसुंदर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील आरोपींन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खर्डा पोलिस हे करित आहेत. सदरची कारवाई सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर व प्रविणचंद लोखंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर व खर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्त केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here