

कुसडगाव ग्रृप ग्रामपंचायतींच्या सरपंच पदी मधुकर माधव खरात यांची बिनविरोध निवड
जामखेड प्रतिनिधी
गेली पंधरा वर्षे कुसडगाव भोगलवाडी व सरदवाडी या ग्रुप ग्रामपंचायतींच्या सदस्यपदी राहीलेल्या मधुकर महादेव खरात यांची या कुसडगाव ग्रृप ग्रामपंचायतींच्या सरपंच पदी निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

जामखेड तालुक्यातील कुसडगाव सरदवाडी व भोगलवाडी या ग्रृप ग्रामपंचायतींची निवडणूक जानेवारी 2021 मध्ये झाली होती. सध्याचे विद्यमान सरपंच अंकुश (पप्पू) नामदेव कात्रजकर यांच्याकडे दोन वर्षापासून सरपंच पदाचा पदभार होता. ग्रामपंचायत सदस्य मधुकर खरात यांना संधी मिळावी म्हणून त्यांनी स्वइच्छेने राजीनामा दिला होता. सध्या या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ सहा महीने राहीला आहे. आज गुरवार दि 14 रोजी कुसडगाव ग्रृप ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची निवड होती. यावेळी मधुकर खरात यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने त्यांची सरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै शरद कार्ले यांनी बोलताना सांगितले कुसडगाव ग्रृप ग्रामपंचायतींच्या सरपंच पदी मधुकर खरात यांची निवड झाली आहे. ते 2010 सालापासून ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम पहात आहेत. त्यांना कामाचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या कडुन गोरगरीब जनतेचे सेवा घडो. गावातील गटतट बाजुला ठेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी माजी माजी सरपंच पुप्पु कात्रजकर म्हणाले की माझे अडीच वर्षे शिल्लक होती मात्र मी मोठ्या मनाने आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला व पुढील सहा महीन्यांसाठी मधुकर खरात यांना सरपंच पदाची संधी दिली. मी दोन वर्षे ग्रामपंचायचा सरपंच असताना मी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावाचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. माजी सरपंच पप्पू कात्रजकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षात कुसडगाव, भोगलवाडी व सरदवाडी गावात विकासगंगा अवतरू लागली. गावातील सर्व मुख्य रस्ते सिमेंट काँक्रिटने जोडण्याचे काम केले आहे. ग्रामपंचायत अंतर्गत पेव्हिंग ब्लॉक जिल्हा परिषद शाळेचे कंपाऊंड व नविन वर्गखोल्या कीचन शेड व अनेक पानंद रस्त्याची कामे केली आहेत. पै. पप्पू कात्रजकर यांनी ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांना कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे. उर्वरित सहा महीने आम्ही सर्वच ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी एकमताने व एक दिलाने कामे करुन गावाचा विकास करणार आहेत. तसेच नवनिर्वाचित सरपंच यांना जी मदत लागेल त्या ठिकाणी खंबीरपणे उभे राहुन गावाचा विकास करणार आहेत.

बापु कार्ले म्हणाले की राज्यात कुसडगाव ग्रृप ग्रामपंचायत एक नंबर उपक्रम राबविणारी ग्रामपंचायत आहे. साडेचार वर्षे जशी एकमताने कामे केली तशीच कामे पुढील सहा महीने करणार आहोत. गावासाठी सर्वजण एकत्र राहून जास्तीत जास्त नीधी आणुन गावाचा विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करणार आहोत. यावेळी नवनिर्वाचित सरपंच मधुकर खरात यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले की माझी सरपंच म्हणून निवड झाली या मध्ये गावातील सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांचा मोठा वाटा आहे. गावातीलच लोकांची इच्छा होती की मी सरपंच व्हावे आणि ती गावकर्यांची इच्छा पुर्ण झाली आहे. सर्वांना विश्वासात घेऊन तीनही गावांचा विकास करणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र जोशी व ग्रामसेवक रामदास फणसे यांनी काम पाहिले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, माजी सरपंच पुप्पु कात्रजकर, उपसरपंच काशिबाई श्रीराम जरांडे, बापुसाहेब कार्ले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर राळेभात, विष्णू गंभीरे, चेअरमन केशव कात्रजकर, हवाशेठ सरनोबत, डॉ. आबासाहेब कात्रजकर, प्रसन्न कात्रजकर, भरत भोगल, ग्रामपंचायत सदस्य मंजुषा संतोष भोगल, शहाजी त्रिंबक गाडे, रुपसुंदर कल्याण वटाणे, वंदना नागेश कात्रजकर, दत्तात्रय गहिनीनाथ कार्ले, सोनाली युवराज गंभीरे, जेष्ठ नेते भानुदास टिळेकर दिलीप गंभीरे, संतोष कदम, संतोष भोगल, बाळासाहेब कदम, अंगद टिळेकर, निलेश वाघ, आबा कात्रजकर, रामदास शिरसाठ, संतोष टिळेकर, रामभाऊ टिळेकर, कल्याण वटाणे, अशोक काकडे, अंकुश कार्ले, जमदाडे महाराज, राहुल भोगल, मुकुंद भोगल, शहाजी गाडे, अब्बास कार्ले, सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





