शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा अन्यथा जनावरे जामखेड नगरपरिषद कार्यालयात सोडु

प्रहार जनशक्ती पक्षाने दिला निवेदनाद्वारे इशारा

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील वाढत चाललेले मोकाट जनावरे यांचा नगरपरिषदेने तातडीने बंदोबस्त करवा. आशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत जर तातडीने बंदोबस्त करण्यात आला नाही तर मोकाट जणांवरांना पकडुन ती जनावरे आम्ही नगरपरिषद कार्यालयात बांधुन निदर्शने करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे जामखेड शहर अध्यक्ष दिनेश राळेभात यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

जामखेड प्रहार शहराध्यक्ष मा. दिनेश राळेभात यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 13 ऑगस्ट रोजी जामखेडचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांना मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हंटले आहे की जामखेड शहरात मोकाट जनावरांचे प्रमाण वाढले आहे ही जणावरे रस्त्यावर बसतात त्यामुळे अनेक अपघात होत आहेत. रस्त्यावर वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे. तसेच ही जणावरे गावालगत आसलेल्या शेतातील उभ्या पिकात घुसुन पिकांचे नुकसान करतात. यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई नगरपरिषदेने द्यावी. अनेक मोकाट कुत्र्यांनी नागरिकांना चावा घेऊन जखमी केले आहे.

याप्रकरणी या मोकाट जणांवरांचा बंदोबस्त तातडीने नगरपरिषदेने करावा यासाठी जामखेड नगरपरिषद ला 20 ऑगस्ट पर्यंत प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष दिनेश राळेभात यांच्यावतीने अल्टिमेटम देण्यात आलेला आहे. जर 20 ऑगस्ट पर्यंत मोकाट जनावरे, डुकरे कुत्रे, यांचा बंदोबस्त केला नाही तर सर्व जनावरे जामखेड नगरपरिषद च्या कार्यालयात सोडण्यात येतील असा इशारा प्रहारचे दिनेश राळेभात यांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे.

त्याचबरोबर प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष दिनेश राळेभात यांनी जामखेड शहरातील विविध पक्ष, सामाजिक संघटना त्याच बरोबर नागरिकांना आव्हान केले आहे की येत्या 20 ऑगस्ट रोजी जामखेड मधील आपापल्या भागातील मोकाट जनावरे पकडून जामखेड नगरपरिषद येथे सोडण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाला सहकार्य करावे असे दिनेश राळेभात यांच्या वतीने सांगण्यात आलेले आहे. निवेदन देता वेळी नय्युम भाई सुभेदार प्रहार ता.प्रमुख नय्युभाई सुभेदार, प्रहार शहराध्यक्ष जामखेड चे दिनेश राळेभात, प्रहार युवक ता.प्रमुख प्रमोद खोटे, पोपट जगदाळे सर, मनसेचे गणेश पवार, विकास राळेभात (शहर संघटक प्रहार) अमोल(भैया) राळेभात(शेतकरी) सतिष राळेभात (शेतकरी) रविंद्र परदेशी, विकास राळेभात (बांधकाम ठेकेदार), संजय डोके (ग्रामपंचायत सदस्य), संदेश राळेभात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here