वृक्षरोपणातुन दिला पर्यावरणाचा संदेश, संजय कोठारी यांचे कार्य उल्लेखनीय – तहसीलदार गणेश माळी
जामखेड प्रतिनिधी
वृक्ष लागवडीतून पर्यावरणाचा एक वेगळा संदेश देणारे म्हणजे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी आहेत. कोठारी यांचे कार्य उल्लेखनीय असे मत जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांनी व्यक्त केले.
जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेड व वन विभाग जामखेडच्या संयुक्त विद्यमानाने सालाबाद प्रमाणे सौताडा घाटामध्ये वृक्षारोपण आज मंगळवार दिनांक 1 जुलै 2025 रोजी करण्याचा आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामखेडचे तहसीलदार गणेश माळी, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धवबाप्पू देशमुख, मा.नगरसेवक अमित चिंतामणी, समर्थ हॉस्पिटलचे संचालक डॉ. भरत दारकुंडे, नरेंद्र गांगुली , डॉक्टर सुनील कटारिया, उद्योजक कांतीलाल कोठारी, युवराज पोकळे, दीपक भोरे, अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे सुप्रिडेट सोभाचंद ललवाणी, प्रा अनिल पोखरणा, संजय नहार ,कृष्णा चिंतामणी, राजेश मोरे, राजेंद्र कुलथे, सचिन गाडे, गोकुळ जाधव, मिठूलाल नवलाखा, प्रकाश मुरूमकर, तनवीर मुलानी, सुभाष भंडारी, मयूर भोसले, धनंजय भोसले, सुमित चानोदिया, संतोष सुराणा, बबन खराडे, विनायक देवा, शहाजी वायकर सर, लक्ष्मण भोरे, वसंत जिने, सचिन थोरात विनोद सावंत, रवी राठोड वनरक्षक धामणगाव, शांतिनाथ सपकाळ, वनरक्षक अरणगाव, नागेश तेलंगे वनरक्षक जामखेड, धर्मवीर तोरंबे वनरक्षक खर्डा, किसन पवार वनरक्षक सा.व.जामखेड, सुधाकर घोडके वनरक्षक सा.व.जामखेड, शामराव डोंगरे वनमजूर, ताहेर आली सय्यद सेवानिवृत्त वन कर्मचारी, भाऊसाहेब भोगल, रामकिसन लहाने, शरद सूर्यवंशी, हरिभाऊ माळशिकारे, माणिक महारनवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना तहसीलदार गणेश माळी म्हणाले जैन कॉन्फरन्स आणि कोठारी प्रतिष्ठान वनविभाग मार्फत सालाबादप्रमाणे आज कार्यक्रम घेण्यात आला संजय कोठारी यांचे कार्य मी गेली दोन वर्षापासून पाहत आहे. खरोखर समाजसेवेत त्यांना आवड आहे प्रत्येक कामात हे अग्रेसर असतात प्रशासनाला मदत करत असतात अपघातातील लोकांना वाचवणे त्यांचे मोठे कार्य आहे. कोठारी यांचे कौतुक करण्यासारखे आहे, असे तहसीलदार माळी म्हणाले
यावेळी सेवानिवृत्त ताहेरअली सय्यद म्हणाले संजय काका कोठारी हे गेले ३०वर्षापासून वृक्षारोपण करत आहेत त्याचबरोबर वन्यजीव प्राण्यांचे जीव वाचवण्याचे काम ते करत आहेत तसेच जखमी झालेल्या वन्यजीव प्राणी यांचे आम्ही त्यांच्या माध्यमातून याच आमच्या जागेमध्ये अंत्यसंस्कार सुद्धा केले आहेत.
यावेळी बोलताना कोठारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले गेले ३० वर्षापासून वृक्षारोपण काम करत आहेत तसेच संगोपन सुद्धा ते करत आहेत आत्तापर्यंत त्यांनी १४०००(चौदा हजार) झाडे लावले असून या वर्षीय साधारण ५०० वृक्ष लावण्याची मानस आहे.