लहु यादव यांनी 36 वर्षे पोलीस खात्याला चांगले योगदान दिले- पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी
सहाय्यक फौजदार लहु यादव यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न
जामखेड प्रतिनिधी
पोलीस दलात सेवा करत असताना सहाय्यक फौजदार लहु यादव यांनी पोलीस खात्यात 36 वर्षे सेवा करुन चांगले योगदान दिले. जनसामान्यांची सेवा करण्याचे काम यादव यांनी केले आहे. असे मत जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी सेवापूर्ती सोहळ्या दरम्यान केले.
जामखेड येथे जामखेड पोलीस स्टेशन चे सहाय्यक फौजदार लहु रामभाऊ यादव यांचा सेवापूर्ती सोहळा समारंभ मंगळवार दि 1 जुलै रोजी दुपारी उत्साहत संपन्न झाला. या दरम्यान सपत्नीक त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक चौधरी हे बोलत होते. पुढे बोलताना पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी म्हणाले की पोलीस स्टेशनला 36 वर्षे योगदान दिले व त्यांनी आपले कर्तव्य चांगले निभावले आहे. पोलीस खात्याची नोकरी करत असताना कुटुंबाकडे दुर्लक्ष होते पण नोकरी करीत असताना त्यांच्या पत्नीने तीन मुलांकडे लक्ष देऊन संभाळ करुन व शिकवून मोठे केले. जामखेड पोलीस स्टेशन मध्ये सेवा करीत असताना देखील त्यांनी आपले कर्तव्य अतिशय चांगले पार पाडलेह 36 वर्षात पोलीस खात्याला योगदान दिले ही अभिमानाची गोष्ट आहे.
यानंतर शंभुराजे कुस्ती संकुलचे मंगेश दादा आजबे म्हणाले की, पोलीस खात्यातील वाहतुक सेवेत काम करणे मोठी कठीण असते. मात्र यादव यांनी यशस्वीपणे जामखेड येथे सेवा पार पडली. जामखेडला वाहतूक व्यवस्था यशस्वीपणे पार पाडत असताना सर्व सामान्य नागरिकांशी नाळ जोडण्याचे काम केले. यानंतर हरीभाऊ बेलेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, यांनी देखील आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार अंकुश यादव यांनी मानले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे, सामाजिक कार्यकर्ते व शंभुराजे कुस्ती संकुल चे मंगेश (दादा) आजबे, भाजपा तालुका अध्यक्ष अजय (दादा) काशिद, आदर्श फाउंडेशन चे अध्यक्ष आकाश बाफना, अरुण आयुर्वेदिक, हरिभाऊ बेलेकर, पो. हे. कॉ अमोल आजबे, पोलीस कॉ प्रकाश जाधव, अंकुश ऊगले, माजी सरपंच गफ्फारभाई पठाण (पाटोदा), अन्सार शेख, वाहतूक शाखा सचिन चव्हाण, दिनेश गंगे, गणेश काळाणे, रविंद्र वाघ, दिपक बोराटे, भागीरथ देशमाने, श्रीकांत शिंदेसह आदी पोलीस कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते संपत नाना राळेभात, रफिक तांबोळी, सोमनाथ क्षिरसागर, अंकुश यदाव आदी कर्मचारी व नातेवाईक उपस्थित होते.