क्रीकेटचा बॉल काढत असताना विजेच्या तारांना चिकटून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू, आठ दिवसातील तिसरी घटना

जामखेड प्रतिनिधी

क्रिकेट खेळताना स्लॅपवरती गेलेला बॉल फ्लेक्सच्या लोखंडी पाईप ने काढत असताना घराजवळील मुख्य विज वाहीनीचा शॉक लागुन 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना जामखेड शहरातील खर्डाचौका जवळील टेकाळे नगर या ठिकाणी घडली. विजेच्या तारांना चिकटून मृत्यू झालेली ही आठ दिवसांतील तिसरी घटना आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की जामखेड शहरातील खर्डा चौकातील टेकाळे नगर या ठिकाणी सोमवार दि 30 जुन रोजी सायंकाळी साडेपाच वाजता प्रणव प्रशांत टेकाळे, वय 12, वर्षे रा. टेकाळे नगर हा आपल्या मित्रांनसोबत घराजवळ क्रीकेट खेळत होता. प्रणव टेकाळे याच्या घराजवळुनच मुख्य विद्युत वाहीनीच्या तारांची लाईन गेली आहे. क्रिकेट खेळत असताना बॉल स्लॅपवरती गेला या जवळच मुख्य विजेच्या तारा होत्या. प्रणव याने फ्लेक्सचा लोखंडी पाईप सदरचा बॉल काढण्यासाठी घेतला व बॉल काढत असताना त्याच्या हातातील पाईपचा या लाईटच्या तारांना धक्का लागला व त्याचा मृत्यू झाला. यावेळी त्याठिकाणी असलेले त्याचे चुलते नातेवाईकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले मात्र पुर्वीच त्याचा मृत्यू झाला. जामखेड पोलीस स्टेशनला याची खबर मयूर टेकाळे यांनी दिल्याने जामखेड पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील सदाफुले वस्ती येथील टेकाळे नगर येथे विजेचा तारेला स्पर्श होऊन प्रणव टेकाळे वय 12 वर्षीय या बालकाचा मृत्यू झाला आहे. हि घटना संपूर्ण शहरात पसरली होती. पण महावितरणच्या अधिकाऱ्यांना काहीही माहिती नव्हते. घटनेनंतर तीन तास झाले तरीही कोणीही महावितरणचे अधिकारी घटनास्थळी गेले नव्हते.

आठ दिवसात तिघांचा मृत्यू

मागिल आठ दिवसापूर्वीच जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथील उसाच्या शेतात खत टाकण्यासाठी गेलेल्या बाप- लेकाचा शेतातील खाली पडलेल्या विजेच्या तारांना चिकटून जाग्यावरच मृत्यू झाला होता. विद्युत महामंडळाच्या गलथान कारभारामुळे या दोघांचा मृत्यू झाला असल्याचे ग्रामस्थांन कडुन बोलले जात होते. यानंतर खर्डा- बाळगव्हाण येथील वायरमन यांना दोषी ठरवुन मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची जामखेड तालुक्यातील येत्या आठ दिवसातील ही तिसरी घटना आहे. मागिल आठ दिवसात विजेच्या तारांना चिकटून तिघांचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here