Home शैक्षणिक शाळेचे विद्यार्थी हेच माझे दैवत – माजी प्राचार्य अशोक दोडके

शाळेचे विद्यार्थी हेच माझे दैवत – माजी प्राचार्य अशोक दोडके

शाळेचे विद्यार्थी हेच माझे दैवत – माजी प्राचार्य अशोक दोडके, नन्नज येथे पंचवीस वर्षांनी भरला माजी विद्यार्थी व शिक्षकांचा पालक मेळावा.

जामखेड प्रतिनिधी

नंदादेवी विद्यालयात शिक्षण घेऊन गेलेल्या माजी विद्यार्थींनी कार्य करत असताना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. माजी विद्यार्थीनी नंतर आपण एक जबाबदार पालक म्हणुन नंदादेवी विद्यालयाच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. नंदादेवी विद्यालयातील विद्यार्थ्यांना गुणवंत शिक्षण मिळाले पाहिजे. कारण विद्यार्थी हेच माझे दैवत आहे. असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक दोडके यांनी व्यक्त केले.

एक दिवसाची शाळा शिकुया आणि पुन्हा लहान होऊया या अनुषंगाने नान्नज येथील नंदादेवी विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा ‘सोहळा गुरुशिष्य मिलनाचा, या स्नेह मेळाव्याचे आयोजन रविवार दि. 22 जून रोजी नान्नज येथील नंदादेवी माध्यमिक विद्यालयात करण्यात आले होते. यावेळी 75 माजी विद्यार्थी आणि सेवा निवृत्त शिक्षक उपस्थित होते. 25 वर्षांनी भेटलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचे स्वागत मोठ्या उत्साहात केले.

विद्यार्थ्यांच्या यशाचे शिक्षक नेहमीच कौतुक करतात परंतु या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचे ऋण व्यक्त करण्यासाठी नान्नज याठिकाणी आयोजित केलेला हा कृतज्ञता सोहळा आणि माजी विद्यार्थी स्नेह मेळावा सर्वांना प्रेरणादायी ठरला आहे. कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर सर्वांनी अतिशय उत्साहत एकमेकांच्या मध्ये गप्पा मारत आपली शाळा आपले शिक्षक वर्गमित्र कसे महत्वाचे आहेत. या घटकांमुळे आपल्या जीवनात कशी कलाटणी मिळाली या आठवणींना विद्यार्थींनी उजाळा दिला.

कार्यक्रमा दरम्यान प्रमुख पाहुणे प्राचार्य विजय पोकळे, नंदादेवी विद्यालयाचे प्राचार्य गोरक्षनाथ रेपाळे सर व नागरगोजे सर यांनी देखील आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य अशोक दोडके सर, प्रमुख पाहुणे प्राचार्य विजय पोकळे, नंदादेवी विद्यालयाचे प्राचार्य गोरक्षनाथ रेपाळे सर, झुंबर पालवे सर, सौ. विनिता दगडे मॅडम, उत्तम वाघमारे सर, राजेंद्र महानवर सर, मा. प्राचार्य नामदेव नागरगोजे, पमराज शिंदे, भिमराव आल्हाट सर, संजय नागवडे, नितेश कोरडे सर पर्यवेक्षक पाटील सर यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर जोकरे, अर्चना शिंदे, अंजली कोळपकर यासह माजी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी विलास चव्हाण, सूत्रसंचालन हनुमंत निकम महाराज आणि आभार हेमंत शेगदार यांनी मानले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!