हॉटेलच्या बीलावरुन हॉटेल मालकास मारहाण, सात जणांवर गुन्हा दाखल

जामखेड प्रतिनिधी

हाॅटेल मधील जेवणाच्या बीलवरुन हाॅटेल मालकास सात जणांनी दगड व लाकडी काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच एकाने गळ्यातील 50 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन घेऊन गेला. याप्रकरणी एकुण सात जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिपक दत्तू जगदाळे, अमोल जगदाळे (पुर्ण नाव माहित नाही), अजित उर्फ दादा शहाजी जगदाळे, राजेंद्र उर्फ चाचा राळेभात, गणेश उर्फ पप्पू दत्तू जगदाळे, सुरज नामदेव जगदाळे, राहुल रामनाथ जगदाळे सर्व राहणार जगदाळे वस्ती जामखेड असे आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी अमोल बाजीराव खरात (वय ३९) रा. बीड रोड, जामखेड यांचे खर्डा रोड, याठिकाणी हाॅटेल निसर्ग नावाचे हॉटेल आहे. दि. 20 जून 2025 रोजी रात्री साडेदहा वाजता आरोपी दिपक दत्तू जगदाळे व अमोल जगदाळे ( पुर्ण नाव माहित नाही) हे दोघे जण हाॅटेलमध्ये जेवण करण्यासाठी आले होते. यानंतर पावणेबारा वाजण्याच्या सुमारास दिपक व अमोल दोघे जण फिर्यादी अमोल खरात यांच्या कडे बील देण्यासाठी आले आहे. यावेळी जेवणाचे बील देण्याच्या कारणांवरून ते फिर्यादी सोबत वाद घालू लागले. यानंतर आरोपी अमोल जगदाळे यांनी हाॅटेल बाहेर येऊन इतर आरोपी साथीदारांना बोलून घेतले.

यानंतर या आरोपींनी फिर्यादीस हाॅटेल बाहेर ओढत नेऊन लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी फिर्यादीचा भाऊ आनंद खरात हा भांडणे सोडवण्यासाठी आला असता त्यालाही आरोपीनकडुन मारहाण करण्यात आली. या झटापटी मध्ये फिर्यादी अमोल खरात यांच्या गळ्यातील पन्नास ग्रॅम वजनाची सोन्याची चैन गळ्यातून तुटून खाली पडली तेव्हा ती चैन अजित उर्फ दादा शहाजी जगदाळे याने उचलून घेऊन गेला. व तुमच्या कडे पाहून घेतो अशी धमकी दिली. या प्रकरणी एकुण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गावडे हे करीत आहेत..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here