
बावर गॅस एजन्सी मध्ये अंदाधुंदी कारभार परस्पर गॅस बुकींग करून काळा बाजार
जामखेड प्रतिनिधी
तालुका पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे जामखेड शहरातील गॅस एजन्सी मध्ये अंदाधुंदी कारभार सुरू असुन ग्राहकांच्या परस्पर गॅस एजन्सीकडुन गॅस बुकिंग होत आहे. याबाबत तक्रार केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत.

येथील बाबर गॅस एजन्सीचे ग्राहक असलेले नान्नज येथील सुमैय्या समिर शेख यांच्या बाबतीत असाच प्रकार घडला असुन शेख यांनी बुकिंग केलेली नसतानाही त्याचे पती पत्रकार समिर शेख यांच्या मोबाईलवर काल दि २१ रोजी गॅस बुकिंग होऊन गॅस डिलेव्हरी झाल्याचा मेसेज आला त्यानी लगेच घरी चौकशी केली असता कुटुंबातील कोणीही गॅस बुकिंग केली नसतानाही मग गॅस कस काय बुकिंग होऊन डिलेव्हरी देखील झाली हा सर्व प्रकार त्यानी बावर गॅस एजन्सीकडे केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर समिर शेख यांनी तहसीलदार गणेश माळी यांच्या कडे लेखी तक्रार केली गेल्या अनेक दिवसांपासून तालुका पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे शहरातील गॅस एजन्सीचा मनमानी कारभार सुरू आहे याबाबत अनेक तक्रारी तहसीलदार कार्यालयात दाखल झाल्या आहेत मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही एलपीजी गॅस धारकांना वर्षाकाठी १२ सिलेंडर देण्यात येतात मात्र काही ग्राहक अनेक महिने गॅस घेत नाही याचाच गैरफायदा घेऊन गॅस एजन्सीचे चालक ग्राहकाच्या परस्पर गॅस बुकिंग करुन गॅस काळ्याबाजारात विक्री करत आहेत ही बाब गंभीर स्वरूपाची असतानाही पुरवठा विभाग हातावर हात ठेवून गप्प बसला आहे याकडे वरिष्ठ अधिकार्यानी दखल घेऊन गॅस एजन्सीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

चौकट
घरगुती गॅसचा व्यवसायीक वापर
जामखेड तालुक्यात घरगुती गॅसचा वापर अनेक हाॅटेल. चहा विक्रेते करत आहेत एलपीजी ग्राहकांना वेळेवर गॅस मिळत नसताना व्यावसायिकांना काळ्याबाजारात तातडीने घरगुती गॅस उपलब्ध करून देण्यात येतो. नेमका हे सिलेंडर बुकिंग न करता कस काय मिळते हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.







