Home क्राईम न्यूज सावधान! जामखेडमध्ये रील बनविण्याच्या नादात तरुणास बसला गळफास अन्….

सावधान! जामखेडमध्ये रील बनविण्याच्या नादात तरुणास बसला गळफास अन्….

 


सावधान! जामखेडमध्ये रील बनविण्याच्या नादात तरुणास बसला गळफास अन्….

जामखेड प्रतिनिधी

व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर टाकण्यासाठी हल्लीची मुलं काहीही करायला तयार असतात. रील बनिवण्याच्या नादात अनेक तरुणांने हकनाक आपले जीव गमावले आहेत तर काही जण जखमी झाले आहेत. अशीच घटना जामखेड शहरात घडली आहे. गळफास घेण्याची रील बनविण्याच्या नादात खरोखरच गळफास बसला मात्र वेळेवर उपचार मिळाल्याने सुदैवाने या तरुणाचे प्राण वाचले आहेत.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, जामखेड जवळील जामखेड करमाळा रोडवरील खटकळीच्या रोड सोडून एक हजार फूट नाल्यात रील बनवण्याच्या नादात तरुणास गळफास बसला या गोष्टीचा त्याच्या नातेवाईकांनी व्हिडिओ सुद्धा काढला आहे. महत्त्वाचे म्हणजे एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करणारा प्रकाश भीम बुडा (वय १७) नेपाळ असे असून रील बनवताना आपल्या नातेवाईक असच व्हिडिओ काढायला लावला होता.

घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना अनंता खेत्रे यांनी आज सकाळी आठ वाजता दिली गळफास घेतलेला व्यक्ती शक्यतो वाचत नाही. ही घटना संजय कोठारी यांनी जामखेड पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना दिली परंतु पुन्हा पाच मिनिटांनी फोन आला. त्यामध्ये थोडासा जीव असल्यासारखे वाटते सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारे हे आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले. रोड सोडून साधारण पाचशे ते सातशे मीटर आत चिखलातून जाऊन संजय कोठारी व रोहन खेत्रे आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने त्यास उचलून आणले. रुग्णवाहिकेत आणून समर्थ हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. लवकर उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले आहेत. सदरची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना दिली असून महेश पाटील यांनी आपले पोलीस हवालदार इंगळे आणि सरोदे यांना पाठवून पुढील तपास चालू आहे.

चौकट

गळफास घेतलेली व्यक्ती शक्यतो वाचत नाही. मी 35 वर्षे झाली समाज सेवा करत आपघातातील जखमींना वाचवत आहे. अनेक आपघातील व्यक्तींना वाचवले आहे. या घटनेतील तरुणास इतरांच्या मदतीने हॉस्पिटल मध्ये लवकर दाखल केले व त्याचे प्राण वाचले. गळफास बसलेल्या तरुणास वाचवण्यात यश आल्याबद्दल मला केलेल्या सामाजिक कामाचे समाधान वाटत आहे आसे मत सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी व्यक्त केले.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!