जामखेड तालुक्यातील खर्डा येथे वादळी वाऱ्यासह पावसाने घरांचे व फळबागांचे नुकसान
वीजपुरवठा खंडित, प्रशासनाकडून पंचनामे सुरू
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात घरांचे व फळबागांचे नुकसान झाले आहे. तसेच लाईटचे पोल देखील पडल्याने दिवसभर विजपुरवठा खंडीत झाला आहे. याबाबत प्रशासनाकडून तातडीने पंचनामे सुरु आसुन घटनास्थळी खर्डा येथील सरपंच संजीवनीताई पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली व तातडीने पंचनामे करुन शेतकर्यांना मदत मिळावी अशी मागणी केली.
याबाबत अधिक माहिती अशी की काल सोमवार दि 9 जुन रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास खर्डा परीसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे परीसरातील शेतकर्याच्या घरांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये खर्डा येथील सोनेगाव रोडवर रहात आसलेल्या प्रभावती बारगजे या रहात आसलेल्या घरावरील छताचे पत्रे उडुन गेले. त्यामुळे घरातील धान्यसह संसार उपयोगी वस्तुंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच शालेय विद्यार्थींची वह्या व पुस्तकेही भिजले. तसेच शिवराम लोखंडे यांच्या कंपाऊंडवर व भिंतीवर झाङ कोसळल्याने कंपाऊंड व गेटचे नुकसान झाले तर सोनेगाव रोडवरील शिंदे वस्ती येथील हरिदास आहेर यांच्या पपईच्या बागेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच परिसरात आनेक ठिकाणी मोठमोठी झाडे व विद्युत पोल उन्मळून पडली आहेत त्यामुळे विजपुरवठा खंडीत झाला आहे. याच बरोबर परिसरात आनेक ठिकाणी विविध स्वरूपाचे नुकसान झाले आहे.
प्रशासनाच्या वतीने सकाळीच पंचनामे सुरू केले आहेत. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांना सरपंच संजीवनी पाटील यांनी दुरध्वनीवरून झालेल्या घटनेची माहिती दिली आणि सभापती शिंदे यांनी तातडीने प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले. यावेळी खर्डा ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. संजीवनीताई पाटील,
तालुका कृषी अधिकारी रविंद्र घुले, शिवराम लोखंडे, ग्रामविकास अधिकारी मिसाळ साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजिनाथ पाटील, केशव वनवे, मंडल अधिकारी नंदकुमार गव्हाणे, कृषी साह्यक गोपाळघरे, मंडल कृषी अधिकारी कटके, तलाठी विकास मोराळे ग्रामविकास आधिकारी बहीर साहेब यांच्या सह शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.