दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत उध्दव देशमुख व अरुण चिंतामणी यांच्या नेतृत्वाखालील सर्व ११ उमेदवार विजयी
जामखेड प्रतिनिधी
शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या येथील दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत उध्दव देशमुख व अरुण चिंतामणी यांच्या नेतृत्वाखालील सर्व ११ उमेदवार निवडून आले आहेत.
दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या संचालक मंडळाच्या या निवडणूकीत ११ जागेसाठी एकूण १३ उमेदवार रिंगणात होते. या निवडणूकीत १७ मतदारांनी आपला निवडणूकीचा हक्क बजावला. यामध्ये उध्दव देशमुख, अरूण चिंतामणी, दत्तात्रय वडे, दिलीप गुगळे, दिलीप चौकटे, शरद देशमुख, डॉ. प्रताप गायकवाड, दिपक होशिंग, डॉ. सुनील कटारिया, शिवाजी कासार, रामनाथ परदेशी यांना प्रत्येकी १५ मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. तर दिलीप बाफना आणि प्रवीण देशपांडे यांना केवळ दोन मतावर समाधान मानावे लागले. अत्यंत शिस्तप्रिय व शांततेत झालेल्या या संपूर्ण प्रकिये नंतर शहरात मोठय़ा प्रमाणात आतषबाजी करण्यात आली.