जीममध्ये उशीरा आला म्हणून उचलुन फरशीवर आपटले, एकजण गंभीर जखमी
जामखेड प्रतिनिधी
जीममध्ये तु उशिरा का आलास असे म्हणत एकास जीममध्येच उचलुन फरशीवर आपटले. या घटनेत फीर्यादीच्या डोक्याला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जामखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एका जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की दि 30 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जामखेड शहरातील एका जीममध्ये फीर्यादी सलमान सुलेमान शेख (वय 29 वर्ष) धंदा मजुरी रा. पाण्याचे टाकी जवळ, सदाफुले वस्ती, जामखेड हा नेहमी प्रमाणे व्यायाम करण्यासाठी आला होता. यावेळी या ठिकाणी आरोपी सागर दत्तात्रय मोहळकर हा जीममध्ये आला व फीर्यादीस म्हणाला की तु जीममध्ये उशीरा का आलास असे म्हणुन फीर्यादी यास शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्यावेळी फीर्यादी हा त्यास समजावुन सांगत असताना त्यांने त्याला गालावर चापट मारली व जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या कंबरेला धरुन वर उचलुन डोक्यावर व मानेवर फरशीवर आपटुन गंभीर जखमी केले. या मारहाणीत फीर्यादी सलमान शेख याच्या डोक्याला व दोन्ही बरगडीला व पायाला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला आरोपी सागर दत्तात्रय मोहळकर याच्या विरोधात दि 3 जुन रोजी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर हे करत आहेत.
आरोपीने मारहाण का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही मात्र तो नशेत होता का? का आनखी काही कारण आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे. कारण जामखेड परिसरात अनेकजण तरुण उत्तेजक नशेच्या आहारी गेलेले आहे. नशेच्या धुंदीत मोठ्या प्रमाणात दहशत माजवली जाते यातून अनेक दुर्दैवी घटना घडतात. याकडे प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे. परिसरात कोठे कोठे अवैध उत्तेजक नशेचे पदार्थ मिळतात. त्या ठिकाणी कडक कारवाई करणे आवश्यक आहे.