जामखेड येथे संघर्ष योध्दा मनोज (दादा) जरांगे पाटील यांची अवधूत पवार यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट.

जामखेड प्रतिनिधी

जामखेड येथील मराठा सेवक अवधूत पवार यांचे वडील प्रसिद्ध लेखक -कवी प्रा. आ. य. पवार यांचे नुकतेच निधन झाले होते. या पार्श्वभूमीवर मराठा संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांनी अवधूत पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे यांनी पवार कुटुंबीयाचे विचारपूस करून सांत्वन केले.

यावेळी बोलताना मराठा संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांनी बोलताना सांगितले की अवधूत पवार यांच्या “वडिलांच्या निधनाबद्दल ऐकून मला खूप वाईट वाटले. खरंतर त्याचवेळी यायला हवं होतं असो…मी तुझ्यासाठी नेहमीच येथे आहे, हे लक्षात ठेव…” असं पाठिवरती हात ठेवून बोलून, पवार कुटुंबातील सर्वांची विचारपूस करून सांत्वन केले.

यावेळी बावी सोसायटीचे चेअरमन सुंदरदास बिरंगळ, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष तात्यासाहेब बांदल, संभाजी मुळे, संभाजी ढोले, दादासाहेब ढवळे बाळासाहेब राऊत, किरण पवार, भाऊराजे शिंदे, महादेव डोके, हिरालाल घुमरे सर, कृष्णकुमार मुरुमकर आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here