जामखेड परीसरातील कलाकेंद्र रात्रभर चालतात, कलाकेंद्र नियमानुसार चालवावीत -रमेश आजबे

ॲड. अरूण जाधव यांच्या वड्याचे तेल वांग्यावर या बातमीस रमेश आजबे यांनी दिले जोरदार प्रतिउत्तर

जामखेड प्रतिनिधी

अँड. अरूण जाधव यांनी वड्याचे तेल वांग्यावर आणू नये गोळीबार व कलाकेंद्र काहीही संबंध नाही अशा आशयाची बातमी दिली होती या बातमीस सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. गोळीबार करणारे जामखेड मध्ये कशासाठी आले होते. ते कोठे कोठे गेले हे अरूण जाधव यांनी पाहावे. जामखेड परीसरातील कलाकेंद्र हे रात्रभर चालतात जर नियमानुसार कलाकेंद्र चालले वेळेची मर्यादा पाळली तसेच कलाकेंद्रात सीसीटीव्ही लावले तर गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल, बाहेरचे गुन्हेगार जामखेड मध्ये येवून गोळीबार करणार नाहीत. उज्ज्वल जामखेड च्या भवितव्यासाठी कलाकेंद्र नियमानुसार चालले तर काहीच प्रश्नच राहणार नाहीत असे सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. तसेच अँड अरूण जाधव यांनी कलाकेंद्रात सीसीटीव्ही बसवण्यासाठी आंदोलन करावे असेही सांगितले.

रमेश आजबे यांनी पुढे बोलताना म्हटले आहे की, ज्या पोरांनी गोळीबार केला ते पोर मटका धंद्याशी निगडित आहेत आणि ते पोरं जामखेडला येऊन दोन कलाकेंद्रावर जाऊन फीरुन येतात त्यानंतर दारूच्या नशेत येऊन ते गोळीबार करतात. त्यांचे जामखेडला यायचं कारण म्हणजे जामखेडचे कलाकेंद्र आणि तिथे चाललेला नंगानाच या पोरांचा जामखेडच्या कलाकेंद्राशी काय संबंध आहे. हे अरूण जाधव यांनी पाहावे जामखेड च्या कलाकेंद्रा मधील अवैध धंदे व शहरातील अवैध धंदे यास प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे.

तसेच नगरपरिषदेच्या गळ्यामध्ये राजरोसपणे मटक्याचा धंदे चालतात आहे याकडे मुख्याधिकारी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे. नगरपरिषद हद्दीत काही कलाकेंद्र आहेत. यातील अनेक कलाकेंद्र नियमांचे उल्लंघन करतात. यामुळे तरूण पिढी बिघडत चालली आहे. तुम्हाला जर एवढाच कला केंद्राचा पुळका असेल तर त्या कला केंद्रावर गाड्यांच्या एन्ट्री पासून ते आत चाललेल्या कलेपर्यंत सीसीटीव्ही बसवून द्या म्हणजे महाराष्ट्रातले अर्धे गुंड आणि त्या गुंडांच्या टोळ्यांमधील लोक पोलिसांना जामखेड मध्ये सापडतील आणि राहिला प्रश्न कुठल्या जातीवर बोलण्याचा तर ते मी कुठल्याही जाती वरती बोललो नाही आणि फक्त कला केंद्र मालक हे जामखेडचे आहेत तिथं कला दाखवणारे लोक दोन टक्के सुद्धा जामखेड मधील नाहीत सर्व बाहेर जिल्ह्यातून तिथं आलेली आहेत येथे कमी वयाच्या मुली बोलून त्यांना कोण वेश्याव्यवसाय करावयास लावत आहे. जामखेडकरांना माहिती आहे.

मी कोणी स्वयंभू पुढारी नाहीये मी समाजामध्ये काम करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला बोलण्याचा अधिकार दिला आहे. आणि त्या अधिकारावर मी बोलत आहे. राहिला प्रश्न इतर तालुक्यांचा त्याचं मला काही घेणं देणं नाही मी काय तुमच्या इतका महाराष्ट्रात राबणारा मोठा पुढारी नाही आणि तुम्हाला जास्त पुळका त्या कला केंद्राचा येत असेल ना तर त्या कला केंद्रामुळे ज्या गोरगरीब घरांवर नांगर चालला, हजारो लोकांचे प्रपंच उध्वस्त झाले त्यांच्या जमिनी गेल्या त्यांचे घर गेले हे तुम्हाला दिसत नाही का? आणि कोण कुठल्या घरात जन्मावे हे देवाने ठरवले आहे उगाच गरिबीचा आव आणू नका त्यात कला केंद्रावर त्याच थिएटरमध्ये गोरगरीब लोकांच्या आयुष्य उध्वस्त झाले हे तुम्हाला दिसत नाही का? कलाकेंद्रावर कला कमी व इतर अश्लीलता जास्त आहे.

तुम्ही म्हणाले शेतकऱ्यांची फसवणूक केली असा तालुक्यात एक पण शेतकरी दाखवा की त्याची मी फसवणूक केली फसवणूक करणे आमच्या रक्तात नाही. तुम्हीच काय काय करता हे आम्हांला सांगायला भाग पाडू नये. आम्ही तोंडावर उत्तर देऊ कोणाची फसवणूक करणार नाही आणि निवडणुकीत जरी आम्ही मत मागितली असली तरी आम्ही दोन नंबरचे धंदे करा वेश्याव्यवसाय करा आणि त्याला प्रोत्साहन देऊ असे म्हणून मत मागितले नाही.

नगरपरिषदेची निवडणूक डोळ्यापुढे दिसून तुम्हाला आता त्यांचा पुळका कदाचित येत असेल आणि इथं विषय समाजाचा नाहीये कुठल्या जातीचा नाहीये इथे विषय वाईट चालीचा रुढीचा आणि वाईट परंपरेचा आहे.
जामखेड मध्ये नगरपरिषदेच्या हद्दीत अवैध दारू, मटका, गांजा विक्री चालतो हे तुम्हाला दिसत नाही का? हे रंगा आणि बिल्ला मिळून जामखेड शहर व शहरा शेजारील गावांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत यावर बोललं तर तुमच्या बुडाला आग लागण्याचे काय कारण आहे. याचा अर्थ तुमचे यांच्याशी लागेबंधे आहेत का? असं कुठेतरी मला वाटतं आणि तुम्हाला कला केंद्राचा जर पुळका येत असेल तर त्या कला केंद्रामध्ये संपूर्ण सीसीटीव्ही लावून रात्री वेळेमध्ये कला केंद्र तुम्ही बंद करावेत. नियमानुसार चालवावेत मग काही प्रश्नच राहणार नाही.

माझे नगर रोडला शोरूम आहे त्या शोरूम शेजारी मी दहा वर्ष थेटरच्या साईटला बिझनेस केला आहे तिथं कोण केव्हा येतं कसं येतं काय प्रकारची लोक येतात हे मला सगळं माहित आहे. हे संपूर्ण तालुक्याला माहित आहे आणि राहिली जामखेडची बदनामी तर याच कलाकेंद्रामूळे संपूर्ण महाराष्ट्रात जामखेड हे पूर्ण बदनाम आहे. कुठेही गेलं जामखेड चा नाव सांगितलं तर लोक चेहऱ्याकडे बघून हसतात याचे एकमेव कारण आहे जामखेड मध्ये असलेले कलाकेंद्र आणि त्या थेटरचा असलेला मनमानी कारभार आणि तिथे येणारे महाराष्ट्रातले गुंड प्रवृत्तीचे लोक तिथे काही सभ्य लोकं येत नाहीत तुम्ही लागले कलाकेंद्राची वाहवा सांगायला तुम्हाला एवढा कलाकेंद्राचा पुळका असेल तर मग एन्ट्री पासून जिथं कलेचे काम चालतं असं तुम्ही म्हणता तिथपासून ते शेवटच्या रूम पर्यंत सीसीटीव्ही फुटेज बसवा आणि त्याचा बॅकअप पोलीस स्टेशनला द्या आणि जामखेड पोलिसांनी सुद्धा हा बॅक अप दर दिवशी चेक केला पाहिजे जर चेक केला तर महाराष्ट्रातले अर्धे गुंड जामखेड मध्ये पोलिसांना सापडतील. यात काही शंका नाही हे करून द्या मग ॲड. अरुण जाधव साहेब तुम्हाला मी मनेल की समाजात चांगलं करणारा नेता आहे उगाच गुंड प्रवृत्तीला थारा द्यायचं काम करू नका?

जामखेड नगरपरिषद यांनी केळी विकणारे, फ्रुट विकणारे यांना उठवून त्या ठिकाणी टपऱ्यामध्ये ओपन मटका घेण्यासाठी पत्र्याचे शेड मारले आहेत का? हे तुम्हाला दिसलं नाही का? त्या मटक्याच्या धंद्यामध्ये गोरगरिबांचे घर गेले जमिनी गेल्या हे तुम्हाला दिसलं नाही का उगाच उठून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तुम्ही उगाच जात गरीब या विषयावर काम करू नका तुम्ही खूप मोठे आहात मोठ्या प्रमाणे वागा असे जोरदार प्रतिउत्तर रमेश आजबे यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here