प्रवचन करुन गावी निघालेल्या महाराजांच्या दुचाकीस आपघात, अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हभप पद्माकर महाराज काळे यांचा मृत्यू

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील धनेगाव (धाकटी पंढरी) येथील हभप पद्माकर महाराज काळे हे खांडवी येथे प्रवचन करून आपल्या घराकडे धनेगाव येथे मोटारसायकलवर रात्री निघाले होते. जामखेड करमाळा रस्त्यावर नान्नज जवळील राजेवाडी येथे अज्ञात वाहनाने धडक दिली यामध्ये काळे महाराज यांचे निधन झाले आहे. यामुळे जामखेड सह धनेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

धनेगाव येथील हभप पद्माकर महाराज काळे हे परिसरात किर्तन व प्रवचन करत होते. शुक्रवार दि 11 एप्रिल रोजी रात्री खांडवी येथे प्रवचन करून आपल्या मुळ गावी धनेगाव येथे मोटारसायकल MH 23 AH 6471 वर चालले होते. रात्री नऊच्या आसपास चालले असताना राजेवाडी जवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली या अपघातात काळे हे मयत झाले. ह.भ.प पद्माकर पांडुरंग काळे रा. धनेगाव (धाकटी पंढरी) ता. जामखेड जिल्हा अहिल्यानगर. अक्षर ओळख नसलेला माणूस भजन, किर्तन प्रवचन करत होते व त्याच बरोबर अनेक ग्रंथ तोंडपाठ होते. त्यांचा संपुर्ण राज्यभरातील संप्रादायीक क्षेत्रातील लोकांशी दांडगा जनसंपर्क होता.

शुक्रवार दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी खांडवी ता.जामखेड येथील हरीनाम सप्ताहाचे प्रवचण करुन मोटारसायकल वरुन रात्री 9 च्या सुमारास घरी परतत असताना एका अज्ञात वाहणाने पाठीमागून धडकड दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पाठीमागे एक अंध वडिल, पत्नी मुलगा व तीन मुली असा परीवार आहे. त्यांच्या जाण्याने जामखेड व आष्टी तालुक्यातीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात धनेगाव येथे सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. रात्री जामखेड पोलीसांनी पंचनामा केला तसेच पुढील तपास पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here