मार्केट कमिटीचे संचालक व सरपंच पती वैजीनाथ पाटील यांच्यावर दहा जणांनी केला हल्ला
खर्डा पोलीस स्टेशनला तीन महिलांसह दहा जणांनवर गुन्हा दाखल
जामखेड प्रतिनिधी
हे पाटील माजलेत यांना जीवे मारा आसे म्हणत, खर्डा येथे मागिल भांडणाच्या कारणावरून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व खर्डा येथील सरपंच पती वैजीनाथ पाटील यांच्यावर दहा जणांनी नाचाक्स, लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी तीन महीलांसह एकुण दहा जणांनवर खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
गहिनीनाथ मुकुंद खरात, श्रीकांत भिमराव लोखंडे, बारक्या नवनाथ खरात, मुकुंद खरात (पुर्ण नाव माहीत नाही), संभाजी केरु खरात, ओकांर परमेश्वर इंगळे, संजीवनी संभाजी खरात, पुजा गहिनीनाथ खरात, सविता बाळासाहेब खरात व एक अनोळखी इसम सर्व रा. शुक्रवार पेठ, खर्डा ता. जामखेड आशा एकुण दहा जणांनवर खर्डा पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की हल्ल्यात जखमी झालेले वैजीनाथ पाटील हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व खर्डा ग्रामपंचायतीच्या सरपंच संजीवनी पाटील यांचे पती आहेत. तर आरोपी श्रीकांत लोखंडे यांची पत्नी खर्डा ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यामुळे श्रीकांत लोखंडे हा ग्रामपंचायतीच्या कारणावरून वाद घालत असल्याने त्याच्या सोबत फीर्यादी पाटील यांच्या मुलाचे भांडण झालेले होते.
फीर्यादी वैजनाथ पाटील हे दि 4 एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजता त्यांच्या मित्रांन सोबत खर्डा शहरातील एका खानावळी मध्ये गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपी श्रीकांत लोखंडे हा हॉटेल समोरुन एक दोन वेळा गेला होता. यानंतर रात्री अकरा वाजता फीर्यादी वैजनाथ पाटील हे हॉटेल मध्ये असताना वरील आरोपींनी हातात नाचाक्स, लोखंडी पाईप व लाकडी दांडके घेऊन आले व हे पाटील माजलेत याला जीवे मारा अशी धमकी दे हातातील नाचाक्स, लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात सुरवात केली. या घटनेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजीनाथ पाटील हे गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना जामखेड येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सध्या पाटील हे हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आसुन त्यांनी दि 5 एप्रिल 2025 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गहिनीनाथ मुकुंद खरात, श्रीकांत भिमराव लोखंडे, बारक्या नवनाथ खरात, मुकुंद खरात (पुर्ण नाव माहीत नाही), संभाजी केरु खरात, ओकांर परमेश्वर इंगळे, संजीवनी संभाजी खरात, पुजा गहिनीनाथ खरात, सविता बाळासाहेब खरात व एक अनोळखी इसम सर्व रा. शुक्रवार पेठ, खर्डा ता. जामखेड आशा एकुण दहा जणांनवर खर्डा पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड हे करीत आहेत.