बनावट सोने तारण प्रकरणी महीलेस अटक, चारही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी
जामखेड प्रतिनिधी
कॅनरा बँक जामखेड शाखेत तीन खातेदारांनी बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून तब्बल १७ लाख ७३ हजार रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केली होती. याप्रकरणी काल चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर तीन जणांना अटक केली होती. या घटनेतील आज एका महिलेस अटक केली आहे. या चारही जणांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या चार जणांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
फसवणूक करणाऱ्यांमध्ये मुन्वर अजीम खान पठाण (रा. नुराणी कॉलनी), अनिता संतोष जमदाडे (रा. बाजारतळ), व दिगांबर उत्तम आजबे (रा. आजबे वाडा, मेन रोड) यांचा समावेश आहे. तर गोल्ड व्हॅल्युअर आण्णासाहेब कोल्हे (रा. शिवम ज्वेलर्स, जामखेड) याच्यावर फसवणुकीत सहभागी असल्याच्या कारणावरून ते गुन्ह्यात आरोपी आहेत.
या घटनेतील महीला आरोपी अनिता संतोष जमदाडे रा. बाजारतळ हीला आज जामखेड पोलीसांनी अटक केली आहे. याबाबत या चारही आरोपींना जामखेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.