Home ताज्या बातम्या शहरातील पक्या अतिक्रमणांवर आठ दिवसात पडणार हातोडा, तहसील कार्यालय झालेल्या बैठकीत निर्णय

शहरातील पक्या अतिक्रमणांवर आठ दिवसात पडणार हातोडा, तहसील कार्यालय झालेल्या बैठकीत निर्णय

शहरातील पक्या अतिक्रमणांवर आठ दिवसात पडणार हातोडा, तहसील कार्यालय झालेल्या बैठकीत निर्णय
राष्ट्रीय महामार्ग, सा. बा. विभाग, नगरपालिका, भुमिअभिलेख व पोलीस प्रशासन करणार संयुक्त कारवाई
जामखेड प्रतिनिधी
गेल्या आनेक वर्षापासून रखडलेल्या शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. या कामस आता वेग येणार आसुन शहरातील पक्या अतिक्रमणांवर येत्या आठ दिवसांत हातोडा पडणार आहे. याबतची बैठक राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी व्यापारी व नागरीक यांच्या उपस्थितीत पार पडली. रस्त्याच्या बाजुचे अतिक्रमण काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग, सा.बा.विभाग, नगरपालिका, भुमिअभिलेख व पोलीस प्रशासन यांच्या कडुन ही संयुक्त पणे ही कारवाई करण्यात येणार आहे.
या बाबत अधिक माहिती अशी आज बुधवार दि 19 मार्च रोजी दुपारी जामखेड शहरातील अतिक्रमण, राष्ट्रीय महामार्ग व नगर परिषद अंडरग्राऊंड पाईपलाईन व भुमिगत गटाराचे काम तातडीने होण्यासाठी जामखेड तहसील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस तहसीलदार गणेश माळी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी शेळके घटमळ साहेब, मुख्याधिकारी अजय साळवे, पोलीस निरीक्षक महेश पाटील प्रा. मधुकर (आबा) राळेभात, पवनराजे राळेभात, राहुल उगले, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, पांडुरंग माने, शिवकुमार डोंगरे, तुषार बोथरा सह अनेक नागरिक उपस्थित होते.
मागिल वेळी दि 10 मार्च रोजी देखील तहसील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. याबाबत मागिल कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी तहसीलदार गणेश माळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की राष्ट्रीय महामार्ग व अतिक्रमण काढण्या बाबत ठेकेदारास सुचना करण्यात आल्या होत्या मात्र त्यांनी कसल्याही प्रकारे सुचनांचे पालन केले नाही. तसेच शहरातील बीड कॉर्नर ते समर्थ हॉस्पिटल रोडचे काम सुरू केले आहे. विंचरणा नदीच्या पुलावरील एका बाजुचे काम सुरू होऊन एका बाजुचा रस्ता वाहतुकीसाठी सुरू केला आहे.
हापटेवाडी येथील मंदिर ते सौताडा घाट पायथ्यापर्यंत अतिक्रमण काढुन रस्त्याचे काम करण्यासाठी रस्ता मोकळा केला आहे. सौताडा घाटातील बाराशे मिटरच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे. शहरातील खर्डा चौक ते समर्थ हॉस्पिटल पर्यंतची पक्की अतिक्रमणे आठ हटविण्यात येणार आसुन 25 मार्च रोजी भुमिअभिलेख कार्यालय, जामखेड नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसुल विभाग व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांच्या संयुक्त रीतीने मोजमाप करुन व खुना करुन सर्वच अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत.
जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी सांगितले की संबंधित विभागाच्या वतीने रीतसर मोजणी करून अतिक्रमण हटवण्यात येणार आहेत. तसेच लगेच याठिकाणी भुयारी गटार व पाणीपुरवठा योजना पाईपलाईन चे काम देखील सुरू करण्यात येणार आहे.
चौकट
ठेकेदार व संबंधित अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार
जामखेड ते सौताडा या राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. या ठिकाणी अनेक वेळा आपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याबाबत अनेकांची निवेदने मला प्राप्त झाली आहेत. याबाबत पोलीस प्रशासन व महसुल विभागाच्या वतीने चौकशीचे काम सुरू आसुन लवकरच दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे आशी माहिती तहसीलदार गणेश माळी यांनी दिली.
अतिक्रमण काढण्यास अडथळा निर्माण केला तर गुन्हा दाखल
जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे मात्र आनेक ठिकाणी पक्की अतिक्रमणे तसेच लाईटचे पोल बाजुला हटवण्यात येणार आहेत. मात्र या कामास कोणी अडथळा आणला तर त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करण्यात येतील आशी माहिती पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!