Home क्राईम न्यूज भुतवडा येथे पाणी मागण्याचा बहाणा करत वृध्द महीलेच्या अंगावरील दागिने लुटले

भुतवडा येथे पाणी मागण्याचा बहाणा करत वृध्द महीलेच्या अंगावरील दागिने लुटले

भुतवडा येथे पाणी मागण्याचा बहाणा करत वृध्द महीलेच्या अंगावरील दागिने लुटले
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील भुतवडा या ठिकाणी मोटारसायकलवर आलेल्या तीन जणांनी पाणी मागण्याच्या बहाण्याने वृध्द महिलेचे तोंड दाबुन दुसर्‍या चोरट्याने कटरच्या सहाय्याने तीच्या अंगावरील तीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून नेले. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला तीन अज्ञात चोरटय़ांन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या रात्री सात वाजता घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की दि 17 मार्च रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास जामखेड तालुक्यातील भुतवडा येथे तीन अज्ञात चोरटे हे मोटारसायकलवर आले. त्यांनी प्रथम वृध्द महिलेस पाणी मागितले व यानंतर एका चोरट्याने फीर्यादी महीला निलावती मुरलीधर डोके वय 70 वर्षे रा. भुतवडा यांचे तोंड दाबले तर दुसर्‍या चोरट्याने कटरच्या सहाय्याने फीर्यादी महीलेच्या गळ्यातील तीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून नेले. यावेळी दागिने लुटून नेत असताना यातील एका चोरट्याने फीर्यादीच्या हाताला चावा घेतला तसेच फीर्यादी व चोरट्यांच्या झालेल्या झटापटीत फीर्यादी यांच्या दोन्ही कानाला जखम झाली आहे. तर एका चोरट्याने फीर्यादी महीलेचे पती मुरलीधर डोके यांना मीठ मारुन पकडुन ठेवले होते.
सोने चोरुन तीनही अज्ञात चोरटे मोटारसायकल वरुन पळुन गेले. सध्या तीनही आरोपी फरार आसुन तीनही चोरट्यांन विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील हे करीत आहेत. रात्री सर्वजण जागे आसतानाच चोरीचा प्रकार घडला असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!