खर्डा परीसरात दारु बंदी विरोधात तीन गावे एकवटली, दारु बंदीसाठी देवदैठण, नायगाव नंतर धामणगाव झाले आक्रमक
जामखेड प्रतिनिधी
सध्या जामखेड तालुक्यात अवैद्य दारु आनेक हॉटेल व टपऱ्यांवर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. परीणामी गावातील तरुण पिढी व्यसनाधीन होत आसुन आनेक महीलांचे संसार उध्वस्त होत आहेत. त्यामुळे आता खर्डा परीसरातील महीला देखील आक्रमक झाल्या आसुन त्यांनी आपल्या गावात दारु बंदीचे हत्यार उपसले आहे. तालुक्यातील देवदैठण, नायगाव व धामणगावा मध्ये देखील बेकायदेशीर दारु बंदी झाली पाहिजे अशी मागणी महीला व ग्रामस्थांन कडुन होत आहे.
मागील काही दिवसांपासून खर्डा परीसरात येथे अवैध दारु विक्रीचा महापूर आला आहे. आनेक गावात दिवस-रात्र गावात दारूची अवैध विक्री होत आहे. त्यामुळे गावातील महिला संतप्त झाल्या आहेत. अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत साहेब, गावात दारु बंदी करा, अशी मागणी महीलांनकडुन होत आहे.
याच अनुषंगाने मागिल काही दिवसांपूर्वी देवदैठण येथील महीला व ग्रामस्थांनी पोलिसांच्या मदतीने गावातील तीन ते चार दुकानावर छापा टाकून बेकायदेशीर विक्री होत असलेली दारु पकडुन दिली. याप्रकरणी खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. मात्र पुन्हा देवदैठण गावात चोरुन दारु विक्री होत आहे आशी माहिती ग्रामस्थांन कडुन मिळत आहे.
नायगाव परीसरातील महीला व ग्रामस्थ देखील दारु बंदी विरोधात आक्रमक झाले आहेत. दि २४ फेब्रुवारी रोजी नायगाव ग्रामस्थांनी देखील तहसीलदार यांना निवेदन दिले आहे व गावातील बेकायदेशीर दारु विक्री बंद झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. अन्यथा महीला, ग्रामस्थ, प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी तसेच शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखिल देण्यात आला आहे.
खर्डा परीसरातील धामणगाव येथील ग्रामस्थांनी देखील बेकायदेशीर दारु विक्री विरोधात आवाज उठवला आसुन याबाबत नुकतीच दि १ मार्च २०२५ रोजी धामणगाव येथे सरपंच महारुद्र महारनवर व निलेश महारनवर (मेजर) यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी दारु बंदी विरोधात बैठक घेतली तसेच येथुन पुढे गावात दारु विक्रीचा प्रयत्न कोणी करु नये असा निर्णय घेण्यात आला. याला ग्रामस्थांनी देखील पाठिंबा दिला आहे. खर्डा परीसरातील गावांमध्ये दारु बंदीची मागणी वाढत असली तरी खरचं गावातील दारूविक्री कायमस्वरूपी बंद होणार का हे पुढे पहावे लागणार आहे.