जामखेड जवळ चारचाकी वहान पल्टी होऊन तीन जण गंभीर जखमी
जामखेड प्रतिनिधी
बीड कडुन जामखेडकडे येत असलेले चारचाकी वाहन हे बीडरोड वरील सुराणा पेट्रोल पंपाजवळ पल्टी होऊन या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचा ताबा सुटल्याने या चारचाकी वाहनाने तीन पल्ट्या खाल्ल्या त्यामुळे हा अपघात झाला. जखमींना तातडीने पोलीस कर्मचारी प्रविण इंगळे व सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या मदतीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की जामखेड शहरापासून दोन कीमी अंतरावरील बीडरोड वर या चारचाकी वाहनाचा आपघात झाला होता. आज दि 2 मार्च 2025 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बीड जिल्ह्य़ातील पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील चार चाकी वाहन क्रमांक MH 15, HU 1226 या गाडीने चार जण पुणे येथे नोकरीच्या कामानिमित्त चालले होते. त्यांची गाडी सुराणा पेट्रोल पंपाजवळ आली असता चालकाचे नियंत्रण सुटले व गाडीने तीन पल्ट्या खाल्ल्या त्यामुळे या आपघातात गाडीमधिल आकाश संतोष भोसले वय 28, अक्षय अजिनाथ जायभाय वय 28 व मोहम्मद बशीर शेख वय 28 तीघेही रा.सावरगाव घाट, ता.पाटोदा जिल्हा बीड हे गंभीर जखमी झाले तर गाडीतील चौथा रोहित महादेव झिंजुरके हा कीरकोळ जखमी झाला आहे.
यावेळी जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस कर्मचारी प्रविण इंगळे हे बीडरोड येथे एका चोरीचा तपास करण्यासाठी आले होते. त्यांच्या जवळच हा आपघात घडला होता. त्यामुळे त्यांनी तातडीने सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना फोनद्वारे माहिती दिली. संजय कोठारी हे तातडीने आपली रुग्णवाहिका घेऊन अपघातस्थळी आले व जखमींना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, पोलीस कर्मचारी प्रविण इंगळे, सचिन गाडे, विशाल ढवळे, तनवीर मुलानी यांच्या मदतीने जामखेड येथील समर्थ हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले.