संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो व्हायरल, निर्दयी कृत्याच्या निषेधार्थ उद्या ५ मार्च रोजी जामखेड तालुका बंद
जामखेड प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या निर्दयी कृत्याच्या निषेधार्थ उद्या बुधवार दि ५ मार्च रोजी जामखेड तालुका बंदचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत चे निवेदन तहसीलदार यांना जामखेड येथील समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने देण्यात आले आहे.
सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून आरोपींनीत्यांची हत्या करताना केलेला अनन्वित छळ आणि क्ररकृत्याचे फोटो समोर आल्यानं संपुर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त होत आहे. याच अनुषंगाने सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या गुन्ह्यातील दोषी व फरार आरोपी यांना अटक करून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून दोषींना फाशीचीच शिक्षा व्हावी याकरिता बुधवार दिनांक ५ मार्च २०२५ रोजी जामखेड तालुका बंदचे आवाहन करण्यात आले आहे आहे.
याबाबत जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष भैय्या देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. दि. ३ मार्च २०२५ रोजी प्रसार माध्यमांवर ती स्व. संतोष भैय्या देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र व्हायरल झाले आहेत. त्यामुळे समाजमन व्यतीत झाले आहे. तसेच समाजामध्ये संतापाची तीव्र लाट पसरली आहे. या गुन्ह्यातील दोषी व फरार आरोपी यांना अटक करून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून दोषींना फाशीचीच शिक्षा व्हावी याकरिता बुधवार दिनांक ४ मार्च २०२५ रोजी जामखेड तालुका बंदचे आवाहन करण्यात येत आहे.
याबाबतचे निवेदन जामखेड पोलीस स्टेशनलाही देण्यात आले आहे. सदर निवेदनावर पांडूरंग भोसले, प्रदिप टाफरे, मंगेश आजबे, धिरज पाटील व आशोक पोटफोडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here