कथाकथन स्पर्धेत बांधखडक शाळेची अक्षरा वारे जिल्ह्यात प्रथम
विविध गुणदर्शन स्पर्धेत केंद्र व तालुकास्तरावर विद्यार्थ्यांनी जिंकली अनेक पारितोषिके
जामखेड प्रतिनिधी
विद्यार्थ्यांमधील सूप्त कलागुणांचा विकास व्हावा यासाठी जिल्हा परिषद अहिल्यानगर दरवर्षी विविध गुणदर्शन स्पर्धांचे आयोजन करत असते. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात नुकत्याच संपन्न झालेल्या या स्पर्धेअंतर्गत तीन शब्दांवरून गोष्ट सादरीकरण अर्थात कथाकथन स्पर्धेत तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा बांधखडकची विद्यार्थीनी अक्षरा अमोल वारे इ. ४थी हिचा केंद्रात, तालुक्यात व जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला. बांधखडकच्या अनेक वर्षांच्या शैक्षणिक इतिहासात विविध गुणदर्शन स्पर्धेतील जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचे बक्षीस पहिल्यांदाच शाळेला मिळाल्याने अक्षराचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
यापूर्वी नुकत्याच संपन्न झालेल्या केंद्र व तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेतसुद्धा बांधखडक शाळेतील विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धांत उल्लेखनीय यश मिळविले. आदिनाथ विजय वारे इ. ४ थी याचा बालगटात वेशभूषा सादरीकरण स्पर्धेत तालुक्यात द्वितीय क्रमांक आला. समिक्षा अरविंद घोडके इ५वी हिचा किशोर गटात वैयक्तिक गायन स्पर्धेत तालुक्यात तृतीय क्रमांक आला, तर सांस्कृतिक तथा नृत्य/नाट्य स्पर्धेत लहान गटात शाळेचा तालुक्यात तृतीय क्रमांक आला.
सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत सादर करण्यात आलेल्या ‘भीमरायाचा संदेश’ या नृत्यगीतात समिक्षा घोडके(गायन),कृष्णा पौडमल(हलगी वादन),करण वारे(ढोलकी वादन),अनिकेत वारे(खंजिरी वादन) ,राम पौडमल(झांज वादन),सोहम वारे (करताल वादन), प्रिती नन्नवरे व सानिका मुरकुटे(अभिनय) श्रेया खाडे,ऋतुजा वनवे,साक्षी घोडके,नयना जावळे(कोरस गायन) प्रतिष्ठा वारे,अक्षरा घोडके,लावण्या उबाळे,खुशी वनवे ,सिद्धी घोडके(नृत्य) इ.सर्व प्रकारांत बालकलाकारांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.