बीड:जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील फरार असलेले आरोपी सापडल्याची माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळे पकडल्याची सूत्रांकडून माहिती आहे. काही वेळात नेमकं कोणत्या आरोपींना पकडले आहे, हे होणार स्पष्ट होणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवीन आरोपी वाढण्याची शक्यता आहे. सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळे याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांनाही पुण्यातून ताब्यात घेतल्याची माहिती आहे, त्यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आरोपी विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदारला याआधीच अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे अद्याप फरार होते. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. यापैकी आता सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक करण्यात आली असून कृष्णा आंगळे अद्याप फरार आहे.
दरम्यान,सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत चौघांची कसून चौकशी केली. यामध्ये डॉ.संभाजी वायबसे व त्याच्या वकील पत्नीसह चौघांचा समावेश आहे. डॉक्टर वायबसे याने देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याला घटनेच्या दिवशी संपर्क केल्याचा व पैसे पुरविल्याची चर्चा आहे डॉक्टर दांपत्याला नांदेड येथून बीडमध्ये आणत ही चौकशी केली गेली याच चौकशीमधून आरोपींची माहिती समोर आली आहे.