जमदारवाडी येथे शाॅर्टशर्किटमुळे!संसार उपयोगी वस्तु व मंडपाचे साहित्य जळून खाक.
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील जमादारवाडी येथील आजबे वस्ती या ठिकाणी संजय मंडपचे संचालक उध्दव आजबे यांच्या घरात शाॅर्टशर्किटमुळे आग लागली या आगीत संसार उपयोगी वस्तू व मंडपाचे मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की आज दि 26 डिसेंबर रोजी सकाळी जमादारवाडी येथील आजबे वस्ती येथील उद्धव आजबे यांच्या घराला लढाईच्या शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. यावेळी घरात संसार उपयोगी वस्तु व मंडपाचे साहीत्य मोठ्या प्रमाणात होते. याठिकाणी आसलेल्या घरातील साहित्याने पेट घेतला. आग विझवण्याचा कुटुंबातील सदस्यांनी प्रयत्न केला मदतीला त्यांनी शेजारील रहिवाशांना आवज दिला परंतु आगीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आसल्याचे आगीचा भडका उडाल्यामुळे आग विझवता येईना काही युवकांनी खिडकीवाटे पाणी फेकून आग आटोक्यात आणली परंतु तोपर्यंत तीन खोलीतील साहित्य जळुन खाक झाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आसे कुटुंबातील प्रमुख अशोक आजबे यांनी सांगितले.

आग विझवण्यासाठी आग्नीशामक बंब घटनास्थळी आला होता तसेच महसूल व विज वितरणचे कर्मचारी यांनी भेट देऊन पाहणी केली. आद्याप आगीचे कारण समजुन शकले नाही उध्दव आजबे यांचा मंडप व्यवसाय आहे त्यासाठी लागणारे मोठे साहित्य त्यांच्या घरात होते त्याच बरोबर कागदपत्रे कपडे धान्य अशा सर्व वस्तू जळुन खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here